Shruti Vilas Kadam
सकाळी केसांना तेल लावणे हा उत्तम पर्याय आहे. त्याच दिवशी केस धुणार असाल, तर शॅम्पू करण्यापूर्वी तेल लावा. यामुळे केस मऊपणा होतात.
रात्री केसांना तेल लावल्याने आराम मिळतो, झोप चांगली लागते. मात्र, काहीवेळी रात्रभर तेल लावून ठेवल्याने टाळूवर चिकटपणा, खाज किंवा कोंड्याचा त्रास वाढतो.
शॅम्पू करण्याच्या साधारण ३० मिनिटे ते दोन तास आधी तेल लावणे हा बेस्ट पर्याय आहे. तेल टाळूचे नुकसान भरण्यास मदत करते. त्यानंतर केस धुतल्यास केस नीट स्वच्छ आणि हेल्दी होतात.
तुमचे केस ड्राय किंवा कुरळे असतील, तर रात्रभर तेल लावल्याने केस मऊ होतात. तेलकट टाळू असल्यास जास्त वेळासाठी तेल लावणे टाळा.
अनेक लोक केसांची वाढ होते म्हणून रात्रभर तेल लावतात. पण असा ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. तेलामुळे केसांचा कोरडेपणा आणि केस तुटणे कमी होते.
केसांना तेल लावताना बोटांच्या टोकांनी हलक्या हाताने मसाज करा. नखांनी टाळू खाजवणे किंवा जोरात घासणे टाळा. केस खूप गुंतलेले असतील, तर ते ओढू नका.
केसांना तेल आठवड्यातून एक-दोनदा तेल लावावे. कोंडा, खाज, लालसरपणा किंवा केसगळतीचा त्रास असेल तर फक्त तेल लावण्याऐवजी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
(टिप : अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या साम टिव्ही याचे १००% समर्थन करत नाही)