Beauty Tips: ना शेविंग, ना थ्रेडिंग! फक्त ४ गोष्टींच्या मदतीने चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी ट्राय करा हा घरगुती उपाय

Shruti Vilas Kadam

जेल बनवण्यासाठी लागणारे साहित्य

हे जेल तयार करण्यासाठी जिलेटिन पावडर – २ चमचे, हळद पावडर – अर्धा चमचा, दूध – ३ चमचे, मिल्क पावडर – १ चमचा

face wax | yandex

सर्व साहित्य एकत्र मिसळा

एका स्वच्छ वाटीत जिलेटिन पावडर, हळद आणि मिल्क पावडर घाला. त्यामध्ये दूध थोडे थोडे घालत जेल व्यवस्थित ढवळा. गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या.

Face Waxing | Canva

जेल योग्य प्रकारे गरम करा

जिलेटिन विरघळण्यासाठी जेल हलक्या आचेवर किंवा गरम पाण्याच्या मदतीने गरम करा. जेल खूप गरम करू नका. चेहऱ्यावर लावण्यापूर्वी ते कोमट झाले आहे हे बोटांना चेक करुन घ्या

Face Waxing | Canva

चेहरा स्वच्छ करा

जेल लावण्यापूर्वी चेहरा फेसवॉशने स्वच्छ करा. जखमा, पिंपल्स, सनबर्न झालेल्या भागावर हे जेल लावू नका.

face waxing | PINTREST

जेल लावण्यापूर्वी काळजी घ्या

जिलेटिनचा पील-ऑफ मास्क त्वचेला चिकटू शकतो आणि तो ओढून काढल्याने त्वचेवर लालसरपणा किंवा जळजळ होऊ शकते. त्यामुळे हे जेल वापरण्यासाठी हातावर टेस्ट करुन पाहा.

face waxing | Yandex

मास्क हळूहळू काढा

जेल त्वचेवर घट्ट झाल्यानंतर जोराने ओढून काढू नका. त्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकते. हे जेल हलक्या हाताने टिशू पेपरच्या सहाय्यने काढा.

face waxing

त्वचेची काळजी घ्या

जेल वापरुन झाल्यानंतर त्यावर हलक्या हाताने मॉइश्चरायझर लावून मसाज करा. चेहऱ्यावर हे जेल वापरल्यानंतर जळजळ, खाज किंवा लालसरपणा जाणवल्यास धुऊन टाका.

(टिप : अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या साम टिव्ही याचे १००% समर्थन करत नाही)

face waxing

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात नेमकं काय होतं? थक्क करणारा दावा

Heart Attack Symptoms | Saam Tv
येथे क्लिक करा