Shruti Vilas Kadam
पुरेशी झोप झाल्यानंतरही खूप थकवा जाणवत असेल किंवा नेहमीची कामे करताना अशक्तपणा जाणवत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. असा थकवा येण्यामागे हार्ट अटॅकचं कारण असू शकतं.
थोडे चालल्यानंतर खूप धाप लागत लागते.किंवा एका ठिकाणी बसलेले असतानाही दम लागत असेल, तर हे हार्ट अटॅकचं लक्षण असू शकते. काही वेळा छातीत दुखत नसतानाही श्वास घेण्यास त्रास होतो.
हार्ट अटॅकच्या वेळी छाती जड वाटणे किंवा छातीत दुखू शकतात. काही व्यक्तींमध्ये असे काही मिनिटं होत आणि मग पुन्हा बरं वाटू लागतं. पण, अशावेळी गॅस समजून दुर्लक्ष करु नका.
हार्ट अटॅकच्या वेळी काही व्यक्तींना मळमळ, उलट्या होतात. ही लक्षणे इतर आजारांमुळेही होऊ शकतात. मात्र, त्यासोबत घाम येणे, दम लागत असेल तर तातडीने डॉक्टरकडे जा.
हार्ट अटॅकच्या वेळी हातांमध्ये, खांद्यामध्ये, पाठीत, मानेत किंवा जबड्यात वेदना होतात. अशा वेदनांकडे कधीच दुर्लक्ष करू नका.
कारण नसताना अचानक थंड घाम येणे, चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडल्यासारखे वाटणे ही हार्ट अटॅकची लक्षणे आहेत. ही लक्षणे दिसल्यास तातडीने रुग्णालयात जाणे आवश्यक आहे.
महिलांनाही हार्ट अटॅकच्या वेळी छातीत दुखू शकते. याशिवाय थकवा, मळमळ, पाठीत वेदना वेदना होतात. त्यामुळे फक्त छातीत दुखणे म्हणजे हार्ट अटॅक असं समजू नका.
(टिप : अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या साम टिव्ही याचे १००% समर्थन करत नाही)