Shruti Vilas Kadam
रोज काही मिनिटे प्राणायाम केल्याने मन शांत होते. हळूहळू श्वास घेतल्याने शरीराला आराम मिळतो. त्यामुळे कामाचा ताण आणि मानसिक थकवा कमी करण्यास मदत होते.
प्राणायामामध्ये श्वास घेणे, थोडा वेळ थांबणे आणि श्वास सोडणे यावर लक्ष केंद्रित केले जाते. नियमित सरावामुळे श्वासाची गती नियंत्रित करता येते.
हळू हळू श्वसनाच्या या योगामुळे शरीराला आराम मिळतो आणि बीपी कंट्रोल होण्यास मदत होते. मात्र, प्राणायाम हा बीपीसाठी एकमेव पर्याय नाही.
प्राणायाम करताना श्वासांवर लक्ष केंद्रित करावे लागते. त्यामुळे मन शांत ठेवण्यास आणि एकाग्रता वाढवण्यास मदत होते. दिवसभर मानसिक ताण वाढत असेल तर रोजची सकाळी प्राणायमने करणे उत्तम पर्याय आहे.
झोपण्यापूर्वी काही मिनिटं शांंत व्हा. यामुळे मन शांत होण्यास मदत होते. यामुळे काही व्यक्तींना चांगली झोप लागण्यास मदत होते.
नियमित प्राणायामामुळे तणाव आणि टेन्शन दूर होण्यास मदत होते. त्यामुळे रोज शांत आणि पॉझिटिव्ह राहण्यास मदत होते.
दिवसाची स्ट्रेस फ्रि सुरुवात होते. तसेच मनशांती मिळण्यास मदत होते. यामुळे शरिराला आराम मिळतो. प्राणायमची सुरुवात करताना आधी ५ ते १० मिनिटं करा आणि नंतर शरिराला सवय झाल्यावर वेळ वाढवा.