Rice Cause Diabetes: भात खाल्ल्याने खरंच मधुमेह होतो? हे वाचा, सर्वात मोठा गैरसमज होईल दूर

Shruti Vilas Kadam

भात खाल्ल्याने थेट डायबिटीज होत नाही

भातामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, जे पचनानंतर ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतात. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. मात्र, केवळ भात खाल्ल्यानेच डायबिटीज होत नाही.

Rice | yandex

इन्सुलिन रेझिस्टन्स महत्त्वाचा

इन्सुलिन हे रक्तातील ग्लुकोज नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करणारे हार्मोन आहे. शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नसतील, तर रक्तातील साखर वाढू शकते.

diabetics | Google

भाताचे प्रमाण महत्वाचे

भात पूर्णपणे बंद करण्याऐवजी तो किती प्रमाणात खातो हे महत्वाचे. एकाच वेळी खूप भात खाल्ल्यास रक्तातील साखर वेगाने वाढू शकते. त्यामुळे भाताचे कमी खावा. डायबिटीज असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Cooked Rice | pinterest

भातासोबत डाळ आणि भाज्या खा

भातासोबत डाळ, उसळ, पालेभाज्या किंवा इतर फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने जेवणातील पोषक घटकांचे शरिराला मिळतात. त्यामुळे भातासोबत बॅलेन्स फूड खाणे गरजेचे असते.

Rice | pinterest

हे भातांचे प्रकार खा

पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत ब्राऊन राइसमध्ये फायबर अधिक असू शकते. बासमती किंवा पारबॉइल्ड राइस हेही काही वेळा उत्तम पर्याय ठरू शकतात.

Brown Rice Pulao | pinterest

या कारणांमुळे डायबिटीजची धोका वाढतो

दिवसभर बसून राहणे, शारीरिक हालचाल नसणे, वजन वाढणे आणि आहार चांगला नसणे यांमुळे टाइप २ डायबिटीज होऊ शकतो. नियमित चालणे, व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे डायबिटीज होण्याचे प्रमाण कमी करतं.

diabetes | pinterest

आनुवंशिकतेमुळेही होतो डायबिटीज

कुटुंबात आई-वडील किंवा जवळच्या नातेवाइकांना डायबिटीज असल्यास आपल्यालाही डायबिटीज होऊ शकतो. मात्र, आनुवंशिकता म्हणजे डायबिटीज होणारच असे नाही.

(टिप : अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या साम टिव्ही याचे १००% समर्थन करत नाही)

diabetes | pinterest

Sabudana Paratha Recipe: उपवासासाठी झटपट घरी बनवा कुरकुरीत साबुदाणा पराठा, वाचा सोपी रेसिपी

Sabudana Paratha Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा