Sabudana Paratha Recipe: उपवासासाठी झटपट घरी बनवा कुरकुरीत साबुदाणा पराठा, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार करा

साबुदाणा पराठा बनवण्यासाठी एक कप साबुदाणा, दोन उकडलेले बटाटे, अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, हिरव्या मिरच्या, जिरे, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ आणि तूप किंवा तेल घ्या.

Sabudana Paratha | Yandex

साबुदाणा भिजवून घ्या

साबुदाणा स्वच्छ धुऊन त्यातील पाणी काढून टाका. त्यानंतर साबुदाणा साधारण ४ ते ६ तास किंवा मऊ होईपर्यंत भिजत ठेवा. साबुदाणा जास्त पाण्यात भिजणार नाही याची काळजी घ्या, नाहीतर मिश्रण चिकट होऊ शकते.

Sabudana Paratha | yandex

बटाटे आणि शेंगदाण्याचा कूट मिसळा

भिजवलेल्या साबुदाण्यात उकडून कुस्करलेले बटाटे घाला. त्यात भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, जिरे, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घाला. सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्या.

Sabudana Chilla | pinterest

पराठ्याचे पीठ मळून घ्या

तयार मिश्रण हाताने चांगले मळून घ्या. मिश्रण खूप ओलसर वाटत असल्यास थोडा शेंगदाण्याचा कूट घाला. मिश्रण घट्ट आणि पराठा थापता येईल असे असावे. त्याचे मध्यम आकाराचे गोळे तयार करा.

Sabudana Paratha

पराठ्याला गोल आकार द्या

प्लास्टिक शीट किंवा बटर पेपरला थोडे तूप लावा. त्यावर मिश्रणाचा गोळा ठेवून हाताने हळूहळू गोल पराठा थापा. पराठा फार पातळ करू नका, अन्यथा तो भाजताना तुटू शकतो.

Sabudana Paratha | Yandex

तव्यावर पराठा भाजून घ्या

गरम तव्यावर पराठा अलगद ठेवा. मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी तूप किंवा तेल लावून भाजा. पराठा सोनेरी रंगाचा आणि बाहेरून कुरकुरीत होईपर्यंत शिजवा. दोन्ही बाजू व्यवस्थित भाजल्यावर तव्यावरून काढा.

Sabudana Paratha

गरमागरम साबुदाणा पराठा सर्व्ह करा

तयार साबुदाणा पराठा गरमागरम सर्व्ह करा. त्यासोबत दही, शेंगदाण्याची चटणी किंवा उपवासाची बटाट्याची भाजी देऊ शकता. उपवासाच्या दिवशी नाश्त्यासाठी किंवा पोटभर जेवणासाठी हा एक चविष्ट पर्याय ठरू शकतो.

Sabudana Paratha

Dry Fruits Benefit: फिट आणि निरोगी राहायचंय? मग 'हे' ड्रायफ्रुट्स ठरतील आरोग्यासाठी सर्वोत्तम

Dry Fruits Benefit: फिट आणि निरोगी राहायचंय? मग 'हे' ड्रायफ्रुट्स ठरतील आरोग्यासाठी सर्वोत्तम | Saam Tv
येथे क्लिक करा