Dry Fruits Benefit: फिट आणि निरोगी राहायचंय? मग 'हे' ड्रायफ्रुट्स ठरतील आरोग्यासाठी सर्वोत्तम

Shruti Vilas Kadam

बदाम खाण्याचे फायदे

बदामामध्ये व्हिटॅमिन ई, फायबर, प्रोटिन आणि मॅग्नेशियम असते. व्हिटॅमिन ई शरीरातील पेशींचे नुकसान कमी करण्यास मदत करते. तसेच बदामातील फायबरमुळे पोट भरलेले राहते.

Almonds Benefits | Canva

अक्रोड हृदयासाठी फायदेशीर

अक्रोडामध्ये ओमेगा-३ असते. हे हृदयाच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे. रोजच्या आहारात अक्रोड खल्ल्याने कोलेस्टेरॉल सुधारण्यास मदत होऊ शकते.

Walnut Benefits | Canva

पिस्ता खाण्याचे फायदे

पिस्त्यामध्ये प्रोटिन, फायबर, व्हिटॅमिन बी६ आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. भूक लागल्यावर चिप्स किंवा फास्ट फूडऐवजी पिस्ता खाणे उत्तम पर्याय आहे.

Benefits of Pista | Canva

काजू शरीराला देतो एनर्जी

काजूमध्ये मॅग्नेशियम, तांबे, लोह आणि हेल्दी फॅट्स असतात. शरीरातील एनर्जी निर्मिती, स्नायूंचे कार्य आणि हाडांच्या आरोग्यासाठी काजू फायदेशीर असतात.

Cashew | yandex

शेंगदाणे आहेत प्रोटिनने भरलेले

शेंगदाण्यांमध्ये प्रोटिन, फायबर, नियासिन असतात. हे पोट भरण्यास मदत करू शकतात. कमी तेलात भाजलेले आणि कमी मीठ असलेले शेंगदाणे रोजसाठी चांगला पर्याय आहे.

शेंगदाणे | pinterest

पेकन नट्समध्ये असतात अँटिऑक्सिडंट्स

पेकन नट्समध्ये फॅट्स, फायबर आणि पॉलीफेनॉल्ससारखे अँटिऑक्सिडंट्स आहेत. हे नट्स सॅलड किंवा ओट्समध्ये घालूनही खाता येतात.

पेकन नट्स

ब्राझील नट्समध्ये असतात सेलेनियम

ब्राझील नट्स हे सेलेनियम असते. सेलेनियम शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. तसेच थायरॉईड असलेल्यांना हे नट्स फायदेशीर ठरतात.

(टिप : अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या साम टिव्ही याचे १००% समर्थन करत नाही)

ब्राझील नट्स

Kuka Cold Coffee Recipe: संध्याकाळी नाश्त्यासोबत घरी बनवा कॅफेसारखी स्वादिष्ट आणि क्रिमी कुक्का कॉफी, वाचा रेसिपी

Kuka Cold Coffee
येथे क्लिक करा