Kuka Cold Coffee Recipe: संध्याकाळी नाश्त्यासोबत घरी बनवा कॅफेसारखी स्वादिष्ट आणि क्रिमी कुक्का कॉफी, वाचा रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार ठेवा

कुक्का कोल्ड कॉफी बनवण्यासाठी १ कप थंड दूध, १ ते २ चमचे इन्स्टंट कॉफी पावडर, २ चमचे साखर, ४ ते ५ बर्फाचे तुकडे आणि २ चमचे चॉकलेट सिरप घ्या. कॉफी अधिक क्रिमी करण्यासाठी व्हॅनिला आइस्क्रीमचाही वापर करू शकता.

Kuka Cold Coffee

कॉफी आणि साखर एकत्र करा

एका छोट्या भांड्यात कॉफी पावडर आणि साखर घ्या. त्यात १ ते २ चमचे कोमट पाणी घालून चमच्याने चांगले मिसळा. यामुळे कॉफीचे मिश्रण व्यवस्थित तयार होईल आणि पेयाला छान चव मिळेल.

Kuka Cold Coffee

मिक्सरमध्ये साहित्य घाला

मिक्सरच्या भांड्यात थंड दूध, तयार केलेले कॉफीचे मिश्रण, बर्फाचे तुकडे आणि चॉकलेट सिरप घाला. तुम्हाला अधिक गोड चव आवडत असल्यास साखरेचे प्रमाण आवडीनुसार वाढवू शकता.

Kuka Cold Coffee | pinterest

कॉफी चांगली ब्लेंड करा

मिक्सरमध्ये सर्व साहित्य ३० ते ६० सेकंद ब्लेंड करा. कॉफीला छान फेस आणि क्रिमी टेक्स्चर येईपर्यंत मिश्रण फिरवा. मात्र, बर्फाचे तुकडे व्यवस्थित बारीक झाले आहेत याची खात्री करा.

Kuka Cold Coffee | pinterest

ग्लास सजवून घ्या

एका उंच ग्लासच्या आतील बाजूला चॉकलेट सिरपने हलक्या रेषा काढा. यामुळे कोल्ड कॉफीला कॅफेसारखा आकर्षक लुक मिळेल. चॉकलेटची चव आवडत असल्यास ग्लासमध्ये थोडे सिरप अतिरिक्त घालू शकता.

Kuka Cold Coffee

कॉफी अधिक क्रिमी बनवा

कॉफीला अधिक घट्ट आणि क्रीमी टेक्स्चर देण्यासाठी ब्लेंड करताना एक स्कूप व्हॅनिला आइस्क्रीम घाला. यामुळे कॉफीची चव अधिक छान लागेल. आइस्क्रीम नसेल तर त्याशिवायही ही रेसिपी तयार करता येते.

Kuka Cold Coffee

थंडगार कुक्का कोल्ड कॉफी सर्व्ह करा

तयार कोल्ड कॉफी सजवलेल्या ग्लासमध्ये ओता. वरून थोडी कॉफी पावडर, चॉकलेट किस किंवा व्हीप्ड क्रीम घाला. घरच्या घरी तयार झालेली थंडगार आणि क्रिमी कुक्का कोल्ड कॉफी लगेच सर्व्ह करा.

Kuka Cold Coffee

Makhana Ladoo Recipe: उपवासात खाण्यासाठी बेस्ट पर्याय, घरी बनवा स्वादिष्ट आणि हेल्दी मखाना लाडू, वाचा सोपी रेसिपी

स्वादिष्ट आणि हेल्दी मखाना लाडू
येथे क्लिक करा