Shahid Kapoor Bought New Home : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने मुंबईत खरेदी केलं अलिशान घर, किंमत वाचून व्हाल अवाक

Shahid And Mira Buy A Luxury Apartment In Mumbai : शाहिद आणि मीरा हे बॉलिवूडमधील फेमस कपल आहे. नुकतंच यांनी मुंबईमध्ये नवीन घर खरेदी केलेलं आहे. त्यांच्या घराची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे.
Shahid Kapoor Bought New Home : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने मुंबईत खरेदी केलं अलिशान घर, किंमत वाचून व्हाल अवाक
Shahid And Mira Buy A Luxury Apartment In MumbaiSaam Tv

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि मीरा राजपूत (Mira Rajput) हे बॉलिवूडमधील फेमस कपलपैकी आहे. हे कपल अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत राहण्याच्या प्रयत्नात असतात. अशातच या कपलने चाहत्यांना एक 'गुड न्यूज' दिलेली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच शाहिद आणि मीराने जुहूमध्ये एक अलिशान लक्झरियस अपार्टमेंट खरेदी केलं होतं. आता पुन्हा एकदा या कपलने नवीन घर खरेदी केलं आहे. शाहिद आणि मीरा यांनी मुंबईत नवं घर खरेदी केलं आहे.

Shahid Kapoor Bought New Home : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने मुंबईत खरेदी केलं अलिशान घर, किंमत वाचून व्हाल अवाक
Radhika Merchant- Anant Ambani च्या दुसऱ्या प्री-वेडिंगची विदेशात होणार धमाल; अख्खं बॉलिवूड राहणार बंद

इंडेक्स टॅप. कॉमच्या (IndexTap.com) रिपोर्टनुसार, मीरा आणि शाहिदने मुंबईत खरेदी केलेल्या घराची किंमत ५९ कोटी रुपये इतकी किंमत आहे. अभिनेत्याने खरेदी केलेले हे नवीन घर मुंबईच्या वरळी भागातील ओबेरॉय 360 वेस्टमध्ये आहे. रजिस्टर केलेल्या माहितीनुसार, हे अपार्टमेंट 5,395 चौरस फूटांचं आहे. शाहिद आणि मीरा यांच्या घरात तीन गाड्यांसाठी पार्किंग स्लॉट आहे. हे नवीन घर त्यांनी २४ मे २०२४ रोजी खरेदी केल्याची माहिती देण्यात आली आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, शाहिद आणि मीराने टॉप फ्लोअरवर हा लक्झरी अपार्टमेंट खरेदी केला आहे. शाहिद आणि मीराने चंदक रिअल्टर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून हे अपार्टमेंट खरेदी केला आहे. त्यांच्या ह्या घराची किंमत ५९ कोटी असून त्यांनी ५८.६३ कोटींना खरेदी केली आहे. या घरासाठी शाहिदने १.७५ कोटी रुपयांचा स्टॅम्प ड्यूटी भरलेला आहे.

Shahid Kapoor Bought New Home : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने मुंबईत खरेदी केलं अलिशान घर, किंमत वाचून व्हाल अवाक
Aranmanai 4 Hindi Trailer: १०० कोटींची कमाई केलेल्या 'अरनमनाई ४'चा हिंदी ट्रेलर रिलीज, हॉरर आणि कॉमेडीचा होणार जबरदस्त तडका

शाहिद कपूरने २०१८ मध्ये त्याच बिल्डिंगमध्ये एक अलिशान अपार्टमेंट खरेदी केले होते. त्याचं ते अपार्टमेंट 8,281 चौरस फूटांचं आहे. त्यावेळी त्याने ते अपार्टमेंट ५५.६० कोटींना खरेदी केली होती. तर त्या अपार्टमेंटची स्टँप ड्यूटी २.९१ कोटी आहे.

Shahid Kapoor Bought New Home : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने मुंबईत खरेदी केलं अलिशान घर, किंमत वाचून व्हाल अवाक
Gela Madhav Kunikade Drama : 'अरे हाय काय अन् नाय काय...' मधला माधव परत येतोय; 'गेला माधव कुणीकडे' नाटकाचा १५ जूनला शुभारंभ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com