बॉलिवूड अभिनेत्याचा अपघात
१३ फुटांवरून अभिनेता खाली पडला
अभिनेत्याच्या हातावर झाली शस्त्रक्रिया
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याचा भीषण अपघात झाला. 'एबीसीडी' फेम अभिनेता आणि डान्स कोरिओग्राफर सलमान युसूफ खानने अलिकडेच रुग्णालयातून काही फोटो शेअर केले. ज्यात त्यांच्या हाताची शस्त्रक्रिया होताना दिसत आहे. अभिनेत्याच्या या पोस्टने चाहते चिंतेत पडले. अभिनेत्याला नेमकं काय झालं, जाणून घेऊयात.
हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सांगितल्याप्रमाणे, सलमानच्या हाताला दुखापत कोणत्याही चित्रपटाच्या सेटवर झाली नसून, कुटुंबासोबत वेळ घालवताना झाली. तो म्हणाला की, "ही सिंपल पण दुर्दैवी घटना होती. आजकाल मुले गॅझेट्समध्ये खूप मग्न असतात, म्हणून मी माझ्या १० वर्षांच्या मुलाला पतंग कसा उडवायचा हे शिकवण्याचे ठरवले. आम्ही गच्चीवर होतो. मी त्याला शिकवले आणि खाली पाठवले; त्यानंतर मलाही उत्साह आला आणि मी स्वतःच पतंग अधिक उंचावर उडवण्याचा प्रयत्न करू लागलो. तेव्हा माझा पाय घसरला आणि मी १३ फुटांवरून खाली पडलो आणि माझा हात मोडला..."
अभिनेता पुढे म्हणाला की, "माझी दोन हाडे मोडली आहेत. एक डान्सर म्हणून दुखापत/फॅक्चर हा माझ्या आयुष्याचा एक भाग राहिला आहे. हाडे नक्कीच बरी होतील. सध्या माझ्यावर उपचार सुरू आहेत. अजून १५ दिवसांत हातावरील प्लास्टर काढले जाईल आणि त्यानंतर महिनाभर फिजिओथेरपी चालेल. साधारण एका महिन्यानंतर मी पुन्हा कामावर परत येईन आणि नाचू-फिरू शकेन..."
अभिनेता चाहत्यांचे आभार मानत म्हणाला की, "मला सर्वांकडून मिळालेले आशीर्वाद, प्रार्थना आणि प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे. लोक माझ्याबद्दल किती मनापासून काळजी करतात, हे जाणून मला खूप कृतज्ञ वाटते. माझ्या कारकिर्दीला सुरुवात होऊन आता एक दशकाहून अधिक काळ लोटला आहे, तरीही लोक माझ्या कामाशी जोडलेले आहेत आणि असे प्रेम दाखवतात. मी खरोखरच नशीबवान आहे असे मला वाटते..."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.