Bollywood Actor: २२ चित्रपट केले; पण लीड रोल नाही, शेवटी राजकारणात गेला

Raja Bundela Career : बॉलिवूड अभिनेत्याने त्याच्या कारकीर्द तब्बल २२ चित्रपट केले. तरी त्यांना लीड रोल मिळाला नाही. सध्या ते काय करतात आणि त्यांचा करिअर प्रवास कसा होता, जाणून घेऊयात.
Raja Bundela Career
Bollywood ActorSAAM TV
Published On

सिनेसृष्टीत अनेक कलाकार आपली आवड जोपासण्यासाठी आणि आपल्याला प्रसिद्धी मिळावी यासाठी येतात. काही कलाकार आपल्या दमदार चित्रपटाने चाहत्यांना वेड लावतात. तर काही कलाकार मोठ्या पडद्यालर फ्लॉप ठरतात. असाच एक हिरो म्हणजे राजा बुंदेला (Raja Bundela ) होय. त्यांनी अनेक चित्रपट केले मात्र त्यांना यश मिळाले नाही.

प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते की, त्याला लीड हिरो म्हणून ओळखले जावे. मात्र हे सुख राजा बुंदेला यांना मिळाले नाही. मात्र या अभिनेत्याला सहाय्यक भूमिका कलाकार म्हणून यश मिळाले. आजच्या युगात सहाय्यक भूमिका करणाऱ्या कलाकारांना जास्त महत्त्व दिले जाते. पण एक काळ असा होता जेव्हा साईड रोल करणाऱ्या कलाकारांना तितकेसे लक्ष दिले जात नव्हते. 80 ते 90च्या दशकातील सहाय्यक कलाकार राजा बुंदेला यांच्या विषयी काही गोष्टी जाणून घेऊयात.

राजा बुंदेला यांनी अनेक चित्रपटात साइड रोलमध्ये दिसले आहेत. राजा बुंदेला हे उत्तर प्रदेशातील ललितपूरचा रहिवासी आहे. दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून त्यांनी अभिनयाचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर ते नायक बनण्यासाठी मुंबईला आले. 1982 मध्ये आलेल्या ब्रिज भूमी या चित्रपटातून राजा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांना नायक म्हणून कधीच यश आले नाही मात्र साइड हिरो म्हणून त्यांची कारकीर्द चांगली होत गेली.

Raja Bundela Career
John Abraham : ब्लॅक कलर अन् कस्टमाइज्ड फिचर; जॉन अब्राहमने खरेदी केली आलिशान कार, किंमत वाचून पायाखालची जमीन सरकेल

राजा बुंदे यांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे 22 चित्रपटांमध्ये काम केले. विजेता, अर्जुन, तारा, स्वर्ग, शोला आणि शबनम, दिव्य आणि हुतात्मा असे त्यांच्या चित्रपटांची नावे आहेत. 'हॅपी फिर भाग जाएंगे' या चित्रपटात ते शेवटचे अभिनेता म्हणून दिसले होते. राजा बुंदेला यांनी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही काम केले.

राजा बुंदे यांनी 'मुझे चाँद चाहिये'सारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. मात्र सध्या ते अभिनय सोडून राजकारणात सक्रिय आहेत. राजकारणात त्याने स्वतःची ओळख तयार केली आहे. सध्या तो सध्या ते बुंदेलखंड विकास मंडळाचे बावीसवे अध्यक्ष आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत.

Raja Bundela Career
R Madhavan : आर. माधवननं केली सुनीता विल्यम्स यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com