.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी सर्व संघ तयार आहेत. मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियमवर सराव करायला सुरुवात केली आहे. मुंबईचा पहिला सामना चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध रंगणार आहे. गेल्या वर्षी हंगाम सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने सर्व फॅन्सला आश्चर्याचा धक्का दिला होता.
रोहितला कर्णधार पदावरुन काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवली होती. आगामी हंगामात हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करताना दिसेल. दरम्यान पहिल्या सामन्यात कशी असेल मुंबई इंडियन्सची प्लेइंग ११? जाणून घ्या.
रोहित शर्माने गेली कित्येक वर्ष मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व केलं. या संघाचं नेतृत्व करताना त्याने ५ वेळेस जेतेपदाची ट्रॉफी जिंकून दिली. मात्र रोहितला काढून हार्दिककडे ही जबाबदारी सोपवणं मुंबईच्या फॅन्सला आणि खेळाडूंनीही आवडलं नव्हतं. त्यामुळे ड्रेसिंग रुममधील वातावरण बिघडल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या.
ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. हार्दिक पंड्या पहिल्या सामन्यात खेळताना दिसून येणार नाहीये. गेल्या हंगामातील शेवटच्या सामन्यात त्याच्यावर स्लो ओव्हर रेटमुळे बॅन लावण्यात आला होता. त्यामुळे तो या हंगामातील पहिल्या सामन्यातून बाहेर होऊ शकतो. त्याच्या जागी सूर्यकुमार यादवकडे संघाची जबाबदारी घेऊ शकतो. तर जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे तो देखील काही सामने बाहेर राहू शकतो.
रोहित शर्मा, रायन रिक्लटन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रॉबिन मिन्झ, नमन धीर, अर्जून तेंडुलकर, मिचेल सँटनर, मुजीब उर रहमान, दिपक चाहर, ट्रेन्ट बोल्ट.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.