आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात मोहिमेवर गेलेल्या भारतीय-अमेरिकन वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या आहेत. तब्बल 9 महिने 14 दिवसानंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या. त्यामुळे जगभरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ही जगासाठी गौरवाची गोष्ट आहे. प्लोरिडामध्ये सुनीता विल्यम्स यांचं यान लँड झाले. सध्या सर्व क्षेत्रातून सुनिता विल्यम्स यांच्यावर प्रेमाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.
बॉलिवूड सुपरस्टार आर. माधवनने (R Madhavan) देखील सुनिता विल्यम्स ( Sunita Williams ) यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करणारी एक खास पोस्ट लिहिली आहे. त्याचा पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आर. माधवने आजवर अनेक हिट चित्रपट केले आहे. त्याच्या अभिनयाने तो कायमच चाहत्यांना घायाळ केले आहे. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. आर. माधवन त्याच्या स्पष्टवक्ता स्वभावासाठी ही ओळखला जातो. नुकतीच त्याने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट केली आहे.
"आमच्या प्रिय सुनीता विल्यम्सचे पृथ्वीवर परत स्वागत आहे. आमच्या प्रार्थनांना यश मिळाले आहे. तुम्हाला सुरक्षित आणि हसतमुख पाहून खूप आनंद झाला. अंतराळातील 260 हून अधिक अनिश्चित दिवसांनंतर सुरक्षित परत येणं ही ही सर्व देवाची कृपा आहे आणि लाखो प्रार्थना करणाऱ्या लोकांच्या आशीर्वाद आहेत. तुमच्या संपूर्ण टीम आणि क्रूला अभिनंदन. देव तुम्हाला आशीर्वाद देईल." आर. माधवनच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
आर. माधवनच्या इन्स्टाग्राम पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पोस्टमध्ये त्याने सुनिता विल्यम्स पृथ्वीवर परतानाचा व्हिडीओ शेअर करून एक खास कॅप्शन त्याला दिले आहे. सुनीता विल्यम्स यांचे यान 19 मार्च रोज पहाटे 3 वाजून 27 मिनिटांनी फ्लोरडा येथे लँड झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.