Lai Avadtes Tu Mala : सरकार- सानिकाचा पारंपरिक अंदाज; 'लय आवडतेस तू मला' मालिकेत येणार नवं वादळ

Lai Avadtes Tu Mala Update : 'लय आवडतेस तू मला' मालिकेत आता सत्यनारायण पूजा पाहायला मिळणार आहे. यासाठी सरकार- सानिकाने पारंपरिक लूक केला आहे. त्यांच्या सतत होणाऱ्या कौतुकामुळे त्यांच्या आयुष्यात नवे वादळ येणार आहे.
Lai Avadtes Tu Mala Update
Lai Avadtes Tu MalaSAAM TV
Published On

'लय आवडतेस तू मला' (Lai Avadtes Tu Mala Update) मालिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सध्या मालिकेत गावात रोजगार निर्माण करून अनेक कुटुंबांना आधार देणाऱ्या सानिकाच्या प्रयत्नांना अखेर सर्वांच्या शुभेच्छा मिळत आहेत. तिच्या या सामाजिक कार्याची पोचपावती म्हणून सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सरकार सानिकाचा पारंपरिक अंदाज यानिमित्ताने मालिकेत दिसणार आहे. या मंगल प्रसंगी संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन आनंद साजरा करत असतानाच काहींना मात्र सानिकाच्या वाढत्या प्रभावाचा राग आहे.

सत्यनारायण पूजेच्या तयारीला जोरात सुरुवात झाली आहे. संपूर्ण कुटुंब एकत्र आले आणि कमलने सानिकाला सून म्हणून स्वीकारल्यानंतर कुटुंबात सकारात्मक वातावरण निर्माण झाले. मात्र या सर्व घडामोडींमध्ये सई आणि मिनल पुन्हा एकदा कट रचत होते. पूजेच्या वेळीच सईने गुरुजींसमोर सरकार आणि सानिकाच्या विवाहासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. यामुळे गुरुजी नाराज होतात आणि पूजा करण्यास विरोध करतात. सरकार सानिका ह्यांची सत्यनारायणाची पूजा पार पडेल की नाही हा प्रश्न उभा ठाकतो.

गावकऱ्यांनी आप्पांऐवजी सानिकाला दिलेल्या मान-सन्मानामुळे कमल नाराज होते. तर सईने पुन्हा नवे डाव रचायला सुरूवात केली. गावकऱ्यांनी सानिकाच्या नेतृत्वाखाली नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे पाहून तिचे कौतुक केले. सानिकाच्या प्रयत्नांमुळे गावाचा विकास होत असल्याचे सर्वांनी मान्य केले. आप्पांनीही सानिकाच्या धडाडीचे कौतुक केले आणि तिच्या या प्रयत्नांना पाठिंबा दिला. गावकरी आणि आप्पांच्या या प्रतिक्रियांमुळे कमल अधिक अस्वस्थ झाली. तिला वाटू लागले की सानिका अप्पांची जागा घेत आहे. मात्र सानिकाने तिच्या कर्तृत्वाच्या जोरावर सर्वांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला.

गावात रोजगार निर्माण करणारी सानिका आणि तिच्या वैवाहिक आयुष्यावर प्रश्न उपस्थित करणारी सई यांच्यातील हा संघर्ष आता कोणते नवे वळण घेणार? सत्यनारायण पूजेच्या साक्षीने सानिकाच्या कर्तृत्वाची कबुली मिळाली असली, तरी सईचा नवा डाव सरकार आणि सानिकाच्या नात्यावर काय परिणाम करणार? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. 'लय आवडतेस तू मला' मालिका रात्री ९.३० वाजता कलर्स मराठीवर पाहायला मिळते.

Lai Avadtes Tu Mala Update
Navjyot Bandiwadekar : दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांचे अनोखे बर्थडे सेलिब्रेशन पाहिलेत का? पाहा PHOTOS

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com