Dombivli : सत्यनारायण पूजा आणि हळदी-कुंकू कार्यक्रमाला अमराठी लोकांचा विरोध, प्रकरण पोलिसात पोहचलं

Dombivli News : डोंबिवलीतील सोसायटीत मराठी विरुद्ध अमराठी वाद समोर आलाय. हा वाद इतका टोकाला गेला की प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहचले.
Dombivli Marathi vs Non-Marathi Dispute
Dombivli Marathi vs Non-Marathi Dispute
Published On

अभिजित देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

Dombivli Marathi vs Non-Marathi Dispute in Housing Society News : कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद उफाळून आला आहे. डोंबिवली नांदीवली मधील एका सोसायटीत सत्यनारायण पूजा व हळदीकुंकू समारंभाला अमराठी कुटुंबीयांनी विरोध केला. तसेच मराठी माणसांना अपशब्द वापरल्याचा आरोप सोसायटीत राहणाऱ्या मराठी कुटुंबांतील महिलांनी केला आहे. सोमवारी रात्रीचा सोसायटीमध्ये या वादातून मोठा गोंधळ झाला. या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय . या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंदवण्यात आलीय . या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय.

गेल्या काही महिन्यांपासून मुंबई , ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई ,पनवेलमध्ये मराठी विरुद्ध परप्रांतीय असे वाद अनेकदा घडल्याचे पाहायला मिळाले. डोंबिवली पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी वाद उफाळून आला आहे. डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली परिसरात साई कमल छाया या इमारतीमध्ये येत्या 2 फेब्रुवारी रोजी सत्यनारायण पूजा व हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आलं आहे.

Dombivli Marathi vs Non-Marathi Dispute
पुण्यात GBS च्या रुग्णांची संख्या वाढली, १७ जण व्हेंटिलिटरवर, आरोग्यमंत्र्यांकडून आढावा

या कार्यक्रमाबाबत सोसायटीच्या बोर्डवर लिहिण्यात आले होते. सोसायटीतील काही अमराठी सदस्यांनी या बोर्डचा फोटो काढून सोसायटीच्या व्हाट्सअप ग्रुप वर अपशब्द वापरले. त्यामुळे या सोसायटीमध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा वाद उफाळून आलाय. काल रात्रीचा सोसायटीमध्ये या वादातून मोठा गोंधळ झाला. या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

याबाबत मराठी कुटुंबाने आरोप केलाय की," अमराठी कुटुंबीयांनी या कार्यक्रमाला विरोध केला. आम्हाला शिवीगाळ केली व मराठा मराठी माणसांबद्दल अपशब्द वापरले". याप्रकरणी या सोसायटीमध्ये राहणाऱ्या मराठी कुटुंबियांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवलीय . अमराठी कुटुंबियांचे हे प्रकार आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा सोसायटीतील मराठी कुटुंबीयांनी दिलाय .मात्र या घटनेमुळे डोंबिवलीत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध मराठी असा वाद उफाळून आल्याचे पाहायला मिळतेय .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com