पुण्यात GBS च्या रुग्णांची संख्या वाढली, १७ जण व्हेंटिलिटरवर, आरोग्यमंत्र्यांकडून आढावा

Pune GBS News : पुण्यात GBS चे एकूण रुग्णसंख्या 101 वरून 111 वर पोहोचल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. यापैकी 17 रुग्ण व्हेंटिलेटर वर असल्याचेही त्यांनी सांगितले.
Pune GBS News
Syndrome Cause Economics Times
Published On

Pune GBS : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात जीबीएसच्या रूग्णांची संख्या वाढतच आहे. सोमवारी संध्याकाळी पुण्यातील जीबीएसच्या रूग्णांमध्ये वाढ झाली. पुण्यातील जीबीएसच्या रूग्णांची संख्या १११ वर पोहचली आहे. रुग्ण हे प्रामुख्याने सिंहगड रोड, खडकवासला, किरकिटवाडी, नांदेडगाव, नांदेडसिटी, धायरी, आंबेगाव या पुणे महानगरपालिका क्षेत्रातील तर काही रुग्ण पिंपरी चिंचवड मनपा आणि इतर जिल्ह्यातील आहेत. आरोग्यमंत्र्यांनी सोमवारी जीबीएसबाबात आढावा घेत महापालिकेला सूचना केल्या आहेत. १११ रूग्णांपैकी काही जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. तर १७ रूग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यान, जीबीएस आजारामुळे एक जण दगावला आहे, त्याचा अहवालही समोर आलाय.

अहवालात काय म्हटलं?

रुग्णाच्या दोन्ही पायांमध्ये अशक्तपणा असल्याने दिनांक १८.१.२०२५ रोजी रुग्णालयामध्ये दाखल. तसेच रुग्णास गिळण्यास त्रास होत होता. सदर रुग्णास २५ Vial Immunoglobulin ५ दिवसांमध्ये देण्यात आलेले होते.सदर रुग्णास दिनांक २५.१.२०२५ रोजी श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले. सदर रुग्णास अतिशय कमी रक्तदाब असल्यामुळे रुग्णास सीपीआर देण्यात आला. उपचारा दरम्यान सदर रुग्णाचा दिनांक २५.१.२०२५ रोजी मृत्यु झालेला असून रुग्णाचे शवविच्छेदन करण्यात आलेले असून रुग्णाचा व्हिसेरा जतन करण्यात आलेला आहे. मृत्युचा अंतिम अहवाल मृत्यु अन्वेषण समितीच्या अहवालानंतर निश्चित होईल.

Pune GBS News
Pune GBS News: पुण्यात गुलियन बॅरी सिंड्रोम का पसरतोय? तुमच्या घरात येणाऱ्या पाण्याशी आहे कनेक्शन

‘जीबीएस’ वर उपचारांविषयी सर्वंकष उपाययोजना करा- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गुलियन बॅरे सिंड्रोम अर्थात ‘जीबीएस’ पसरलेल्या भागातील या आजारामागची कारणे शोधण्यासह पाणीपुरवठा स्रोतांची, पाणीपुरवठा करणाऱ्या खासगी व शासकीय टँकरमधील पाण्याची तपासणी, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, लक्षणे आढळलेल्या व्यक्तींना तात्काळ रुग्णालयात दाखल होण्यासाठी आवाहन तसेच जनजागृती करणे आदी सर्वंकष उपाययोजना कराव्यात असे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी दिले. आजारातून बरे होण्याचे प्रमाण मोठे असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असेही ते म्हणाले.

Pune GBS News
GBS Syndrome ने पुण्यानंतर सोलापूरचं टेन्शन वाढवलं; दोन संशयित रुग्ण आढळताच आरोग्य यंत्रणा सतर्क

विधानभवन येथे ‘जीबीएस’ आजाराविषयी आढावा बैठकीत मंत्री आबीटकर बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, राज्याचे आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन आंबाडेकर, प्रभारी अतिरिक्त विभागीय आयुक्त समिक्षा चंद्राकार, सहसंचालक आरोग्य सेवा बबीता कमलापूरकर, उपसंचालक डॉ. आर. बी. पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येम्पल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे, पिंपरी चिंचवड मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे आदी उपस्थित होते.

Pune GBS News
Pune GBS News : पुण्यात मेंदू व्हायरसचं थैमान सुरूच, जीबीएस रूग्णांची संख्या शंभरीपार, अनेकजण व्हेंटिलेटरवर

आरोग्यमंत्री आबीटकर म्हणाले, प्रामुख्याने हे रुग्ण आढळलेल्या भागातील पाण्यांचे नमुने घेऊन त्याची तपासणी करावी. आजारातील बहुतांश रुग्ण बरे होत असून एकदम थोड्य रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता पडत आहे. त्यामुळे नागरिकांना घाबरुन जाऊ नये, याबाबत वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करावी. पाणी उकळून पिणे, स्वत:ची रोगप्रतिकारक्षमता वाढविणे तसेच स्वच्छ पाण्याचा आग्रह धरणे या उपाययोजना महत्त्वाच्या असून त्याबाबत जनजागृती करावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com