GBS Syndrome ने पुण्यानंतर सोलापूरचं टेन्शन वाढवलं; दोन संशयित रुग्ण आढळताच आरोग्य यंत्रणा सतर्क

GBS Syndrome Disease Patient In Solapur : पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या वाढत असताना सोलापुरात देखील दोन संशयित रुग्ण आढळून आली आहेत. शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार चालू आहेत.
GBS  Syndrome
GBS Syndrome Disease Patient In Solapur Saam Tv
Published On

विश्वभूषण लिमये, साम प्रतिनिधी

पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम थैमान घातलंय. पुण्यातील रुग्णांची संख्या शंभर पार गेली आहे. आता या व्हायसरने जिल्ह्या ओलांडत सोलापूरमध्ये शिरकाव केलाय. सोलापूरमध्ये GBS चे आणखी दोन संशयित रुग्ण आढळ आले आहेत. रुग्ण आढळल्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झालीय. रुग्णांचे सॅम्पल महापालिकेच्या आरोग्य विभागाने तपासणीसाठी पाठवले आहेत.

सोलापूर शहरात आढळले दोन जीबीएस संशयित आजाराचे रुग्ण सापडल्यानंतर त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार केले जात आहे. या रुग्णांचे रक्ताचे नमुने रुग्णांचे सॅम्पल महापालिकेच्या आरोग्य विभागाने तपासणीसाठी पाठवली आहेत. आढळलेल्या संशयित रुग्णांमध्ये एक रुग्ण वयोवृद्ध असून तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातलाच आहे. डिसेंबर महिन्यापासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

GBS  Syndrome
Pune GBS News : जीबी सिंड्रोमने घेतला पहिला बळी, प्रशासन अलर्ट मोडवर; वाचा स्पेशल रिपोर्ट

तर दुसरा रुग्ण हा मूळचा लातूर जिल्ह्यातील असून त्याचे वय ३५ आहे. या रुग्णाला काही दिवसापूर्वी सोलापुरात खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे, त्याची प्रकृती स्थिर आहे. या दोन्ही रुग्णांमध्ये जीबीएस सदृश्य लक्षणे आढळून आल्याने त्यांना जीबीएस संशयित महापालिका प्रशासनाने त्यांचे सॅम्पल चाचणीसाठी घेतले आहेत. पुण्यातून या विषाणूची बाधा झाल्यानंतर सोलापुरात रुग्णाचा मृत्यू झाल्याने प्रशासनदेखील अलर्ट मोडवर आले आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रनेची आज बैठक होत आहे.

GBS  Syndrome
GB Syndrome: पुण्यात जीबी सिंड्रोमचं थैमान, रुग्णांची संख्या 59 तर 22 व्हेंटिलेटरवर

गुलियन बॅरी सिंड्रोम का पसरतोय?

जीबीएस’ रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुणे महापालिका आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी नांदेड येथील विहीर व अन्य ठिकाणची पाहणी केली. सिंहगड रस्त्यावर गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) आजाराचे रुग्ण वाढत असल्याने महापालिकेने ११ ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी राज्य शासनाच्या प्रयोग शाळेत पाठवले होते. त्यातील सर्व ठिकाणचे पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल दिला. पण हा आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचेही राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (एनआयव्ही) अभ्यासातून समोर आलेले आहे.

पुण्यात आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांची संख्या १०१ झालीय. यापैकी ६२ रुग्ण पुणे ग्रामीण, १९ रुग्ण पुणे महापालिका, १४ रुग्ण पिंपरी चिंचवड महापालिका आणि ६ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. त्यामध्ये ६८ पुरुष व ३३ महिला आहेत. यापैकी १६ रुग्ण व्हेन्टीलेटरवर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com