Pune GBS News : जीबी सिंड्रोमने घेतला पहिला बळी, प्रशासन अलर्ट मोडवर; वाचा स्पेशल रिपोर्ट

Pune GBS Cases : पुण्यात जीबी सिंड्रोमने पहिला बळी घेतलाय. त्यानंतर प्रशासनही अलर्ट मोडवर आलंय. त्यामुळे या जीवघेण्या आजारापासून वाचण्यासाठी नेमकं काय करायला हवं? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
Pune GBS Cases News
Pune GBS Cases NewsChatGPT
Published On

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune GBS News : गुईलेन बॅरे सिंड्रोमने पुणेकरांची चिंता वाढवली असतानाच जीबी सिंड्रोमने पुण्यात पहिला बळी घेतलाय. जीबी सिंड्रोमची लागण झालेल्या सोलापूरच्या तरुणावर पुण्यात 5 दिवस उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला.

जीबीएसचा राज्यात पहिला बळी

- पुण्यात कामाला असलेल्या सोलापूरच्या तरुणाचा मृत्यू.

- पुण्यात सीए असणाऱ्या तरुणाला जुलाबाचा त्रास.

- सोलापुरात कार्यक्रमासाठी गेला असता अशक्तपणा वाढला.

- जीबीएसचं निदान झाल्यानंतर 5 दिवस ICU मध्ये उपचार.

- ICU मधून बाहेर हलवल्यानंतर श्वसनाचा त्रास आणि नंतर मृत्यू.

पुण्यात जीबी सिंड्रोमचे 74 रुग्ण आढळले आहेत. त्यातील 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत... मात्र पुण्यात जीबी सिंड्रोमचा पहिला बळी गेल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जीबी सिंड्रोमच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचं जाहीर केलंय.

जीबी सिंड्रोमने पुणेकरांची धाकधूक वाढवली असताना या आजारापासून वाचण्यासाठी काय करायला हवं? पाहूयात.

हे करा, जीबी सिंड्रोम टाळा.

- पाणी उकळून थंड करून प्या.

- शौचास गेल्यानंतर आणि जेवणाआधी साबणाने हात स्वच्छ धुवा.

- भाज्या आणि फळं चांगली धुवून मगच खा.

- मांसाहारी पदार्थ योग्य प्रकारे शिजवा.

- कच्चं किंवा कमी शिजलेलं अन्न, विशेषतः अंडी आणि मासे खाणं टाळा.

Pune GBS Cases News
Manoj Jarange Patil : वाल्मीक कराडच्या सुटकेवरून मनोज जरांगेंचा संताप, म्हणाले 'मुख्यमंत्र्यांच्या मुंडक्यावर पाय देऊन...'

गुईलेन बॅरे सिंड्रोम हा आजार अशुद्ध अन्नपदार्थ, प्रदुषित पाणी यापासून होतो. या आजारामुळे शरीरातील नसांवर परिणाम होतो. त्यामुळे तुमच्या हातापायाला वारंवार मुंग्या येत असतील किंवा तुमचे स्नायू कमकूवत वाटत असतील तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Pune GBS Cases News
Raigad Politics : पालकमंत्रिपदावरुन आदिती तटकरेंचा भरत गोगावलेंना खोचक टोला; म्हणाल्या, ''पदाची इच्छा ठेवणे गैर नाही पण.."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com