Lai Avadtes Tu Mala : 'सरकार-सानिका'च्या लग्नात मोठं विघ्न, नवीन ट्विस्टमुळे मालिकेत काय वळण येणार?

Sarkar-Sanika Wedding : 'लय आवडतेस तू मला' मालिकेत आता नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. 'सरकार-सानिका'च्या लग्नात साहेबराव नेमकं काय करणार , जाणून घ्या.
Sarkar-Sanika Wedding
Lai Avadtes Tu MalaSAAM TV
Published On

प्रेम म्हणजे यशस्वी आणि आनंदी जीवनाचा सूत्र होय. प्रत्येक नात्याचा पाया हा विश्वास आणि प्रेम असतो. सध्या 'लय आवडतेस तू मला' (Lai Avadtes Tu Mala) या मालिकेमध्ये सानिका आणि सरकारच्या आयुष्यात अनेक घटना घडत आहेत. पंकजा, सर्वेश आणि त्यात भर म्हणजे सईने रचलेल्या जाळ्यात सानिका अडकते आणि सरकारवर असलेल्या विश्वासाला तडा जातो. तेव्हापासून दोघांचे नाते एका नाजूक वळणावर येऊन पोहचले होते. सानिका सरकारच्या गोड नात्याला सईची दृष्ट लागता प्रेम शेवटी जिंकते असं म्हणायला हरकत नाही.

खूप कट कारस्थानांना सामोरे जात अखेर सानिकाला झालेला गैरसमज दूर होतो आणि तिला विश्वास पटतो की सरकारने तिला त्यांच्याबद्दलचे खरं सांगितले होते. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात लग्न ही खूप महत्त्वाची घटना असते. कारण यानंतर तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. ती स्वत:च घर सोडून दुसऱ्या घरी जाते. लवकरच सरकार आणि सानिका देखील बाप्पाच्या साक्षीने या बंधनात अडकणार आहेत. पण त्याच दरम्यान साहेबराव त्यांचे लग्न मोडण्यासाठी देवळात येऊन सरकारवर गोळी झाडतो.

मालिकेत आता सरकार सानिकाला सई त्याच्या मामाची मुलगी आहे आणि तिला दोघांमध्ये दुरावा आणि वाद घडवून आणायचे आहेत म्हणून ती नाटक करतेय. सानिका सईला हाकलायला जाते. सई सानिकावर हल्ला करते ते बघून साहेबराव रागाने सईला घराबाहेर काढतात. हे घडत असताना सानिका - सरकार यांच्या नात्याबद्दल सावित्रीला कळते. सानिका सरकार सावित्रीसमोर प्रेमाची कबुली देतात . याचे वाईट परिणाम दोघांना भोगायला लागतील म्हणून सावित्री त्यांना पळून जाण्याचा सल्ला देते. सावित्री समजावते सानिका आणि सरकारला पळून जाण्याशिवाय पर्याय नाही. सानिकाला सावित्रीची खंबीर साथ नेहेमीच मिळाली आहे.

सरकार सानिकाच्या लग्नातील विघ्न बाप्पा कसं दूर करणार? सानिका आणि सरकारचे नाते पुढे कुठल्या वळणावर येणार? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. हा विशेष भाग २ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता आणि संध्याकाळी ७ वाजता पाहता येणार आहे. हा माघी गणेश जयंती एका तासाचा विशेष भाग आहे.

Sarkar-Sanika Wedding
Akshar Kothari: मराठमोळ्या अभिनेत्याने खरेदी केली आलिशान गाडी, किंमत वाचून बसेल धक्का

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com