मकर संक्रांत (Makar Sankranti ) हा सण महाराष्ट्रात अतिशय उत्साह, आनंदामध्ये साजरा केला जातो. मकर संक्रात म्हटलं की, पहिली गोष्ट आठवते ती तीळगुळाचे लाडू, तिळाच्या वड्या आणि हलवा. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यत सगळ्यांना हे तीळगुळाचे लाडू खूप आवडतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पतंग उडवणे.
कलर्स मराठीवरील 'लय आवडतेस तू मला' मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेमं दिले. मालिकेमधील सरकार आणि सानिकाची जोडी, त्यांच्यातील मैत्री, भांडण, कडू – गोड आठवणी, त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास याचे प्रेक्षक साक्षी आहेत. सरकार - सानिकाने नेहेमीच त्यांच्यासमोर येणाऱ्या आव्हानांना खंबीरपणे उत्तर दिले आहे. दुसरीकडे 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेतील पाच जणींची मैत्री, त्यांच्यावर येणारी संकंट, त्यांचं नातं त्यांच्यातील भांडणं हे देखील बघायला प्रेक्षकांना आवडत आहे.
'लय आवडतेस तू मला' (Lai Avadtes Tu Mala) मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. सानिकाने आपल्या प्रेमाची कबुली दिली असून तिला कुठेतरी वाटते आहे राजा म्हणजेच सरकारने देखील त्याचं तिच्यावर प्रेम आहे हे काबूल करावे. पण, सरकारची काही कारण आहेत त्यामुळे तो करू शकत नाहीये. यातच सर्वेश - सानिकाचा साखरपुडा होणार आहे. पण, आता सरकार - सानिकाच्या प्रेमावर पंकजा संक्रांत आणणार आहे.
'पिंगा गं पोरी पिंगा' (Pinga Ga Pori Pinga) मालिकेत पिंगा गर्ल्सचा बिल्डर विरोधात लढा बघायला मिळणार आहे. बुलबुल बॅग वाचवण्यासाठी पाचची जणी मैदानात उतरणार आहेत. बिल्डर वल्लरीला पैसे देतो. पण, तिला कळतं नाही असं त्याने का केले असेल बरे. वल्लरीला त्याचे उत्तर कळते, आणि ते ती पिंगा गर्ल्सना सांगते. आपल्यात फूट पडली आहे जे त्याला कळले आहे आणि त्याचाच फायदा त्याने घेतला आहे. यानंतर बिल्डर पिंगा गर्ल्स ना धमकी देतो कि दोन दिवसात रस्त्यावर आणणार मग ते म्हतारे असो वा तरुण सगळे बाहेर येणार. पण, वल्लरी मात्र निडरपणे त्याला तोंड देते आणि त्याला रस्ता दाखवताना दिसली आहे. आता वल्लरी सर्व शेजारीना प्रेरित करते आणि गत्यांची मदत घेते.
'लय आवडतेस तू मला' ही मालिका संध्याकाळी 7.00 वाजता आणि दुपारी 1 ला पाहायला मिळते. तर 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिका दुपारी 2 वाजता आणि संध्याकाळी 8.00 वाजता प्रदर्शित होते. या दोन्ही मालिकांचे मकर संक्रांत स्पेशल भाग 12 जानेवारीला कलर्स मराठीवर पाहाता येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.