महाराष्ट्राचे महानायक अशोक सराफ (Ashok Saraf ) यांना अनेक वर्षांनी छोट्या पडद्याने खुणावलं, ते 'कलर्स मराठी'वर सुरु असलेल्या 'अशोक मा.मा.' (Ashok Mama) या मालिकेने एक वेगळा विषय, उत्तम कलाकारांचा संच, उत्कृष्ट लेखन आणि अर्थातच अशोक मामा यामुळे मालिका सुरु होताच प्रेक्षकांची पसंती त्याला मिळाली. मालिकेतील इतर महत्त्वाचे कलाकार रसिका वाखारकर, नेहा शितोळे, आणि बच्चे कंपनी यांनी देखील आपल्या कामाने सर्वांची मने जिंकली.
रिटायरमेंटच्या वयात असलेले अत्यंत शिस्तप्रिय, काटेकोरपणे वागणारे असे अशोक मामा. च्या एकाकी आयुष्यात आयुष्यात एक असं वादळ आलं ज्याने त्यांचं संपूर्ण आयुष्य ढवळून निघालं. मुलाच्या आणि सुनेच्या अकाली मृत्यूनंतर आता नातवंडांची जबाबदारी त्यांच्यावर येऊन ठेपली आहे आणि यातला सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे भैरवी. आता मामा नातवंडांचे हट्ट, लाड कसे पुरवणार? कशी त्यांना शिस्त लावणार? हे पाहण उत्सुकतेच असणार आहे. थोडक्यात नातवंडांसह नव्या वर्षात सुरु झाली आहे 'अशोक मा.मा.' यांची सेकंड इनिंग ! 'अशोक मा.मा.' ही मालिका ८.३० वाजता कलर्स मराठीवर पाहता येणार आहे.
मालिकेमध्ये येत्या आठवड्यात अशोक मा.मा. आणि मुलांचे बदलेले नाते व बदलत जाणारं नातं, त्यांच्या नात्यातील कंगोरे आणि मामांची एक वेगळीच बाजू बघायला मिळणार आहे. एकीकडे त्यांनी स्वीकारलेली जबाबदारी आणि त्यासाठी आजच्या काळाशी जुळवून घेण्यासाठी मामांचे प्रयत्न, जॉब मिळविण्याची सुरु असलेली धडपड आणि दुसरीकडे मामांचे नातवंडांसह नातं बघायला मज्जा येणार आहे.
इरा म्हणजेच निया पवार म्हणाली, "अशोक मामांसोबत काम करायला मिळणे हे तर माझं भाग्य आहे. मामांकडून रोज नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. अशोक मा.मा. ह्या मालिकेत अशोक मामा हे माझे आजोबा आहेत आणि आम्हा तिन्ही भावंडांमध्ये मी त्यांची लाडकी नात आहे. खऱ्या आयुष्यात मी कधीच आजोबांचं प्रेम अनुभवलं नव्हतं पण अशोक मा.मा. निमित्ताने आजोबांचं प्रेम अनुभवयला मिळालं ते ही अशोक मामा हे आजोबा हे मी माझं भाग्य समजते.
पुढे निया बोली की, "आता सुरू असलेल्या सेकंड इनिंग मध्ये आजोबा आणि इराचं नातं आणखीनच समजूतदार झालंय त्यांच्या मनातल्या गोष्टी ती सहजच ओळखू लागली आहे. खूप वेळा आजोबांसोबत सीन करताना सीन छान झाला की ते डोक्यावरती हात ठेवून बोलतात "पिल्लू खूप छान सीन केलास" आणि मामांकडून आपल्या कामाचं कौतुक होणं म्हणजे मी केलेल्या कामाची पोचपावती मिळण्यासारखंच आहे."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.