Grandparents Rights On Children: आई-वडिलांइतकाच मुलांवर आजी-आजोबांचा देखील समान हक्क; हायकोर्टाचा निर्णय, VIDEO

Delhi High Court Decision: आईवडिलांइतकाच मुलांवर आजी-आजोबांचा देखील समान हक्क आहे, अशी टिप्पणी दिल्ली हायकोर्टाने केलीय. आपण या प्रकरणाबाबत सविस्तर जाणून घेवू या.
मुलांवर आजी-आजोबांचा समान हक्क
Grandparents Rights On ChildrenSaam Tv
Published On

मुंबई : मुलांवर जितका आईवडिलांचा हक्क असतो, तितकाच त्यांच्या आजी-आजोबांचा देखील हक्क आहे, असा एक महत्वाचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिलाय. दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या एका आदेशात म्हटलंय की, आजी-आजोबांना त्यांच्या नातवावर जेवढे अधिकार आहेत, तेवढेच अधिकार पालक किंवा इतर नातेवाईकांना देखील आहेत. एका महिलेला तिच्या चार वर्षांच्या मुलीच्या आजी-आजोबांशी व्हिडिओ कॉलवर बोलण्याचे आदेश देत उच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवलं आहे.

'असं' आहे प्रकरण

या प्रकरणात एक महिला आपल्या चार वर्षांच्या मुलीला घेवून जर्मनीला गेली होती. मुलीला हजर करण्यासाठी तिच्या वडिलांनी हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती. मुलगी खूपच लहान असल्याने तिला आईसोबत राहण्याचा निकाल खंडपीठाने दिला होता. परंतु आईने मुलीला तिच्या वडिलांपासून किंवा आजी-आजोबांपासून दूर नेऊ नये, अशी सूचना देखील देण्यात आली (Grandparents Rights On Children) होती.

दिल्ली उच्च न्यायालयाचं निरीक्षण

दिल्ली उच्च न्यायालयानं म्हटलंय की, आजी-आजोबांना स्वतःच्या मुलांपेक्षा नातवंडांची जास्त ओढ (Delhi High Court) असते.जसे आईवडिल आपल्या मुलांपासूनचे अंतर सहन करू शकत नाहीत, तसेच आजी-आजोबा देखील नातवांपासून दूर राहू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे निर्देश न्यायालयाने या प्रकरणात दिले आहेत.

मुलांवर आजी-आजोबांचा समान हक्क
Grandparents wedding : प्रेमाला वयाचं बंधन नाही; वयाच्या सत्तरीत धुमधडाक्यात आजी-आजोबानं बांधली लग्नगाठ

मुलांवर आजी-आजोबांचा देखील समान हक्क

न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंह आणि न्यायमूर्ती अमित शर्मा यांच्या खंडपीठाने मुलीच्या आईला कागदपत्रांमधून वडिलांचे नाव काढून टाकू नका, असं देखील सांगितलं आहे. अर्थात मूल तिच्यासोबत आहे. पण, तिचे राष्ट्रीयत्व भारतीयच राहिले (Grandparents Rights) पाहिजे, कारण वडील भारतीय आहेत. खंडपीठाने वडिलांच्या बाजूने निकाल दिलाय. तो आपल्या मुलीला भेटण्यासाठी जर्मनीला जाऊ शकतो. तसेच, मुलीला आजी-आजोबांशी दररोज व्हिडिओ कॉलवर बोलायला लावले पाहिजे. तसेच जेव्हा ती महिला आपल्या मुलीसह भारतात येईल तेव्हा मुलीला आजी-आजोबांसोबत वेळ घालवू द्यावा, असे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत.

मुलांवर आजी-आजोबांचा समान हक्क
Isha Ambani Blessed With Twins: मुकेश अंबानी पुन्हा झाले आजोबा, मुलगी ईशाने दिला जुळ्या मुलांना जन्म

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com