Grandparents wedding : प्रेमाला वयाचं बंधन नाही; वयाच्या सत्तरीत धुमधडाक्यात आजी-आजोबानं बांधली लग्नगाठ

येथील वृद्धाश्रमाचेचालक बाबासाहेब पुजारी यांनी या दोघांचं धुमधडाक्यात लग्न लावून दिलं.
Grandparents wedding
Grandparents weddingSaam TV
Published On

Grandparents wedding in Shirol: प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. वृद्धपकाळात प्रत्येक व्यक्तीला एकटं एकटं वाटतं. त्यासाठी ते सतत माणसांचा आधर शोधत असतात. काही काम होत नसल्यानं अनेक घरांमध्ये वृद्ध व्यक्तींना वृद्धाश्रमात पाठवलं जातं. अशा परिस्थितीत जर जोडीदारानेही आयुष्याची साथ सोडली असेल तर जगण कठीण होऊन बसतं. अशावेळी हवी असते मायेची आणि प्रेमाची साथ. (Grandparents wedding viral News)

शिरोळ तालुक्यातील घोरसवाड येथे जानकी नावाचं वृद्धाश्रम आहे. येथील दोन्ही आजी-आजोबा समान व्यधींनी त्रस्त होते. मात्र एकमेकांबरोबर आपल्या आयुष्यातील सुख दुख: शेअर केल्याने त्यांच्या मनाला मोठं समाधान मिळत होतं. त्यामुळे त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या नात्याला सर्वांनीच परवानगी देत शुभेच्छा दिल्या.

Grandparents wedding
Wedding Tips: लग्नात वर- वधू एकमेकांच्या गळ्यात वरमाला का घालतात? माहितीये का

येथील वृद्धाश्रमाचे चालक बाबासाहेब पुजारी यांनी या दोघांचं धुमधडाक्यात लग्न लावून दिलं. यावेळी सर्व संविधानीक नियमांचे पालन करत लग्न लागलं. या दोघांच्या याच लग्नाची आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

Grandparents wedding
Hardik-Natasha Wedding : हार्दिक आणि नताशाच्या लग्नातील खास फोटो

अनुसया शिंदे असं ७० वर्षांच्या नवरी आजीचं नाव आहे. त्या पुण्यातल्या वाघोरी येथे राहिवासी आहेत. तर बाबूराव पाटील असं नवरदेव असलेल्या आजोबांच नाव आहे. ते ७५ वर्षांचे असून शिरोळ येथील रहिवासी आहेत. या दोघांचेही आधिचे साथीदार या जगात नाहीत.

अशात या दोघांची मने एकमेकांशी जुळली आहेत. आपल्या आयुष्यातील सर्व आनंद आणि दु:खाचे क्षण ते एकमेकांना सांगतात. त्यांची मनं जुळत असल्यानेच दोघांनीही विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. यावेळी दोघेही सुंदर नटले होते. त्यांच्या लग्नाचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com