ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
विवाह म्हणजे एक पवित्र संस्कार मानला जातो.
विवाह करताना अनेक प्रथा, परंपरा असतात. अनेक सोहळे असतात ते त्या पध्दतीने करावेच लागतात.
यापैंकी एक सोहळा म्हणजे वरमाला घालणे.
एकमेकांना वरमाला घालणे म्हणजे दोघांनी एकमेकांना जोडीदार म्हणून स्वीकारल्याचे प्रतीक मानले जाते.
सुंदर फुलांनी बनलेली ही वरमाला असते. वरमालातील फुले सुगंधित असतात. हे शुभ आणि प्रसन्नतेचे प्रतीक मानले जाते.
यातील फुलांचा अर्थ म्हणजे वधू-वर या दोघांचे जीवन हसत खेळत आणि आनंदाने भरलेले असावे.
वरमाला घालणे ही प्रथा केव्हापासून सुरू झाली याबाबत कोणतेही लेखन नाही.