John Abraham : ब्लॅक कलर अन् कस्टमाइज्ड फिचर; जॉन अब्राहमने खरेदी केली आलिशान कार, किंमत वाचून पायाखालची जमीन सरकेल

John Abraham New Car Price : बॉलिवूडचा 'हँडसम हंक' जॉन अब्राहमने नुकतीच नवीन आलिशान कार खरेदी केली आहे. त्याच्या कारचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही नवीन गाडी किती रुपयांची आहे, जाणून घेऊयात.
John Abraham New Car Price
John Abraham SAAM TV
Published On

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham ) कायम त्याच्या हटके स्टाइलसाठी ओळखला जातो. आजवर त्याने अनेक हिट चित्रपट करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तो ॲक्शन चित्रपटांचा हिरो आहे. नुकताच जॉन अब्राहमच्या घरी नवा पाहुणा आला आहे. ज्याची सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. हा पाहुणा दुसरा तिसरा कोणी नसून जॉन अब्राहमची नवी कोरी आलिशान कार आहे.

जॉन अब्राहमची नवीन कार

जॉन अब्राहमने नवीन गाडी खरेदी केली आहे. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. जॉन अब्राहमने महिंद्रा थार रॉक्स (Mahindra Thar ROXX) ही गाडी खरेदी केली आहे. जॉन अब्राहमसाठी कस्टमाइज्ड ब्लॅक थार रॉक्स डिझाइन करण्यात आली आहे. यात त्याने टॉप-स्पेक AX7 L मॉडेल विकत घेतले आहे. डॅशबोर्डवर 'मेड फॉर जॉन अब्राहम' असे देखील लिहिण्यात आले आहे.

जॉनची नवी कोरी कार मोचा ब्राउन-थीम असलेली केबिन असलेली डिझेल 4WD व्हेरिएंट आहे.मीडिया रिपोर्टनुसार, जॉन अब्राहमच्या नवीन कोऱ्या कारची महिंद्रा थार रॉक्सची किंमत (New Car Price) जवळपास 12.99 लाख ते 23.09 लाख रुपये इतकी आहे. जॉन अब्राहमने आपली नवीन कार कस्टमाइज केली आहे. सीटच्या हेडरेस्टवर पिवळ्या रंगात 'JA' ही सिग्नेचर दिसत आहे. जॉन अब्राहमला कारची खूप आवड आहे.

जॉन अब्राहमकडे याआधी लेम्बोर्गिनी गॅलार्डो आलिशान कार आहे. सध्या जॉन अब्राहमच्या नवीन गाडीची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. त्याच्या गाडीच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

जॉन अब्राहम वर्क

अलिकडेच जॉन अब्राहम 'द डिप्लोमॅट' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटातील त्याची भूमिका चाहत्यांना खूप आवडली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

John Abraham New Car Price
Suraj Chavan : मार्केट गाजवायला अन् पोरीला लाजवायला येतोय सूरज, दमदार टीझर पाहिलात का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com