Emraan Hashmi: इम्रान हाश्मीची साऊथ फिल्म इंडस्ट्रीत धांसू एन्ट्री, 80 कोटींच्या 'या' बिग बजेट चित्रपटात दिसणार

Goodachari 2 Movie: अभिनेता इम्रान हाश्मी आगामी स्पाय ॲक्शन थ्रिलर 'गुडाचारी 2' मध्ये दिसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटात इम्रान हाश्मी आदिवी शेषसोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार असल्याचे बोलले जात आहे.
Emraan Hashmi
Emraan Hashmi Saam Tv
Published On

Emraan Hashmi Entry In South Film Industry:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) मागच्या वर्षी 'टायगर ३' चित्रपटाच्या (Tiger 3 Movie) माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटामध्ये त्याने विलनची भूमिका साकारली होती. इम्रान हाश्मीने आपल्या करिअरमध्ये अनेक चित्रपटात निगेटिव्ह भूमिका साकारल्या आहेत. 'टायगर ३' मधील त्याची भूमिका देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडली. आता इम्रान हाश्मी २०२४ मध्ये प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी पुन्हा सज्ज झाला आहे. या वर्षामध्ये अनेक चित्रपटांमध्ये तो दिसणार आहे. अशामध्येच आता इम्रान हाश्मीबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. इम्रान हाश्मीने साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री केली आहे.

अभिनेता इम्रान हाश्मी आगामी स्पाय ॲक्शन थ्रिलर 'गुडाचारी 2' मध्ये (Goodachari 2 Movie) दिसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटात इम्रान हाश्मी आदिवी शेषसोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटामध्ये इम्रान हाश्मी नकारात्मक भूमिका साकारणार नसल्याची देखील चर्चा आहे. इम्रान हाश्मीच्या या सहकार्याबद्दल चित्रपटाचे निर्माते खूप उत्सुक आहेत. निर्मात्यांना वाटते की, इम्रान खानमुळे हा चित्रपट देशभरात लोकप्रिय होईल.

आदिवी शेषने या चित्रपटाच्या प्रीक्वल 'गुडाचारी'मध्ये काम केले आहे. 'गुडाचारी' चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. आता या चित्रपटाचा सिक्वेल 'गुडाचारी 2' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या वर्षीपासून या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. आता या चित्रपटामध्ये इम्रान हाश्मी दिसणार असल्याचे कळाल्यापासून त्याच्या चाहत्यांना कमालीचा आनंद झाला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून इम्रान हाश्मी साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री करणार आहे.

Emraan Hashmi
'या' ठिकाणी झाली Ankush Chaudhary आणि Deepa Parab यांची पहिली भेट, VIDEO शेअर करत जुन्या आठवणींना दिला उजाळा

'गुडाचारी'ला मिळालेल्या भरघोस यशानंतर आता या चित्रपटाचा पार्ट २ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2018 मध्ये शशी किरण टिक्का दिग्दर्शित तेलुगू चित्रपट 'गुडाचारी' मध्ये शोभिता धुलिपाला, जगपती बाबू आणि प्रकाश राज हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. आता या चित्रपटच्या दुसऱ्या पार्टमध्ये म्हणजे 'गुडाचारी 2' मध्ये इम्रान हाश्मीसोबत नसीरुद्दीन शाह, विजय राज हे कलाकार दिसणार आहेत.

इम्रान हाश्मीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, इम्रान हाश्मी शेवटी 'टायगर 3' चित्रपटामध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात तो सलमान खान आणि कतरिना कैफसोबत दिसला होता. यापूर्वी हा अभिनेता अक्षय कुमारसोबत 'सेल्फी' चित्रपटातही दिसला होता. पण त्याचा हा चित्रपट फ्लॉप ठरला.

Emraan Hashmi
तुझा अभिमान वाटतो!, Mugdha Vaishampayan ला मुंबई विद्यापीठाकडून मिळाले सुवर्ण पदक; पत्नीसाठी Prathamesh Laghate ची खास पोस्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com