'या' ठिकाणी झाली Ankush Chaudhary आणि Deepa Parab यांची पहिली भेट, VIDEO शेअर करत जुन्या आठवणींना दिला उजाळा

ankush chaudhari and deepa parab Lovestory: अंकुशने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामाध्यमातून त्याने त्याच्या लव्हस्टोरीचा खुलासा केला आहे. दीपा आणि त्याची पहिली भेट कुठे आणि कशी झाली? हे त्याने या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे.
ankush chaudhari and deepa parab Lovestory
ankush chaudhari and deepa parab LovestorySaam Tv
Published On

Ankush Chaudhari Video:

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अकुंश चौधरी (Ankush Chaudhari) हा सर्वांचा लाडका आहे. अंकुश चौधरीचा मोठा चाहतावर्ग आहे. आजही त्याच्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. आजही तरुणाईंच्या हृदयावर अंकुश चौधरी राज्य करतोय. अंकुश चौधरी सध्या चर्चेत आला आहे. यामागचे कारण म्हणजे अंकुशने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामाध्यमातून त्याने त्याच्या लव्हस्टोरीचा खुलासा केला आहे. दीपा आणि त्याची पहिली भेट कुठे आणि कशी झाली? हे त्याने या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे.

अंकुश चौधरी आणि दीपा परब हे मराठी सिनेसृष्टीतील सर्वांचे आवडते कपल आहे. त्यांची लव्हस्टोरी खूपच खास आहे. अंकुश आणि दीपाने लग्नापूर्वी तब्बल १० वर्षे एकमेकांना डेट केले. त्यानंतर हे कपल विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाला आता १५ वर्षे पूर्ण झाली आहे. अंकुशने यानिमित्ताने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पत्नी दीपासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

अंकुश आणि दीपा या दोघांनीही आपल्या इन्स्टाग्राम अकऊंटवर व्हिडीओ शेअर करत त्यांची पहिली भेट कुठे झाली आणि ते कसे एकमेकांच्या प्रेमात पडले हे सांगितले आहे. या दोघांनीही आपल्या चाहत्यांना त्यांच्या भेटीचे ठिकाण दाखवले आहे. अकुंश चौधरी आणि दीपा परब हे दोघेही परेलच्या महर्षी दयानंद कॉलेजमध्ये शिकले. याच ठिकाणी त्यांची भेट झाली होती. त्यानंतर त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर या दोघांनीही एकमेकांना आयुष्याचा जोडीदार म्हणून निवड केली.

ankush chaudhari and deepa parab Lovestory
तुझा अभिमान वाटतो!, Mugdha Vaishampayan ला मुंबई विद्यापीठाकडून मिळाले सुवर्ण पदक; पत्नीसाठी Prathamesh Laghate ची खास पोस्ट

अंकुश चौधरीने व्हिडीओ शेअर करत सांगितले की, 'हाय आम्ही एनडी कॉलेजला आलो आहोत. खूप वर्षांनंतर. १९९३ ला आम्ही इथे शिकायला होतो. हिच ती जागा, हाच तो कट्टा आमचा. हे कॉलेज आमचं. या कट्ट्यावर आम्ही बसायचो टाइमपास करत.' या व्हिडीओमध्ये दीपा देखील 'खूप छान वाटतंय ना.', असं म्हणताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत दोघांनीही कॅप्शनमध्ये 'College Days!जुन्या आठवणींना उजाळा..!', असे कॅप्शन दिले आहे. त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे.

ankush chaudhari and deepa parab Lovestory
बिग बजेट सिनेमा आणि तगडी स्टारगास्ट असतनाही 'Fighter' पडला मागे, २०० कोटीपर्यंत पोहचण्यातही मिळालं नाही यश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com