तुझा अभिमान वाटतो!, Mugdha Vaishampayan ला मुंबई विद्यापीठाकडून मिळाले सुवर्ण पदक; पत्नीसाठी Prathamesh Laghate ची खास पोस्ट

Mugdha Vaishampayan : मुग्धाला मुंबई विद्यापीठाकडून सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले आहे. तिच्या या सुवर्ण कामगिरीबद्दलच प्रथमेशने आनंद व्यक्त करत पत्नीचं कौतुक केले आहे.
Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate
Mugdha Vaishampayan and Prathamesh LaghateSaam Tv
Published On

Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate:

'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' (Sa Re Ga Ma Pa Li'l Champs) फेम मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) आणि प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) हे कपल मागच्या वर्षी विवाहबंधनात अडकले. लग्न झाल्यापासून हे कपल चांगलेच चर्चेत असते. दोघेही सोशल मीडियावर पोस्ट करत एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करताना दिसतात. नुकताच प्रथमेशने आपल्या पत्नी मुग्धासाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे. यामागचे कारण देखील तितकेच खास आहे. मुग्धाला मुंबई विद्यापीठाकडून सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले आहे. तिच्या या सुवर्ण कामगिरीबद्दलच प्रथमेशने आनंद व्यक्त करत पत्नीचं कौतुक केले आहे.

मुग्धा वैशंपायन आपल्या मधूर आवाजाने प्रेक्षकांचे मन जिंकते खरं पण फक्त संगीत क्षेत्रातच नाही तर शैक्षणकि क्षेत्रातही ती चांगली कामगिरी करत आहे. मुग्धा वैशंपायनने नुकताच भारतीय शास्त्रीय संगीताच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात सर्वाधिक गुण मिळवण्याची कामगिरी केली आहे. या उत्कृष्ट कामगिरीसाठीच मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात मुग्धा वैशंपायनला सुवर्ण पदक देऊन गौरविण्यात आले. मुग्धाच्या या सुवर्ण कामगिरीमुळे तिचा पती प्रथमेश लघाटेला प्रचंड आनंद झाला आहे. त्याने पत्नीसाठी एक खास पोस्ट केली आहे.

Prathamesh Laghate Post
Prathamesh Laghate Post Instagram

प्रथमेशने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर पत्नी मुग्धासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. त्याने मुग्धाचा सुवर्ण पदक आणि सर्टिफिकेट स्वीकारतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्याने मुग्धाचे सुंदर शब्दात कौतुक केले आहे. त्याने असे लिहिले की, 'बायको तुझे खूप खूप अभिनंदन, आम्हाला तुझा अभिमान वाटतो.' या पोस्टमध्ये त्याने लाडक्या बायकोसाठी हार्ट इमोजी देखील पोस्ट केले आहे. सध्या प्रथमेशची ही पोस्ट व्हायरल होत असून चर्चेत आली आहे.

Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate
बिग बजेट सिनेमा आणि तगडी स्टारगास्ट असतनाही 'Fighter' पडला मागे, २०० कोटीपर्यंत पोहचण्यातही मिळालं नाही यश

मिळालेल्या माहितीनुसार, मुग्धा वैशंपायन ही मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागातंर्गत संगीत अधिस्नातक (एम.एफ.ए) (गायन) हा दोन वर्षीय पदव्युत्तर पदवी अभ्यास करत होती. तिने हा अभ्यासक्रम 2021 ते 2023 या कालावधीमध्ये यशस्वीरित्या पूर्ण केला. या अभ्यासक्रमामध्ये मुग्धाने सर्वाधिक गुण मिळवले. त्यासाठी ती दिवंगत श्री रंजनकुमार एच. वैद्य सुवर्ण पदकाची मानकरी ठरली. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या दिक्षांन्त समारंभामध्ये मुग्धा वैशंपायनला सुवर्ण पदक देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला मुग्धाच्या आई आणि वडिलांनी देखील हजेरी लावली.

Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate
Vicky Kaushal Injured: विकी कौशलच्या हाताला काय झालं? व्हिडीओ पाहून चाहते आले चिंतेत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com