Bobby Deol Cried In Front Of The Paparazzi
Bobby Deol Cried In Front Of The PaparazziInstagram

Bobby Deol Emotional Video: ‘ॲनिमल’मध्ये रणबीरऐवजी बॉबीनेच भाव खाल्ला; कौतुक ऐकून रस्त्यात ढसाढसा रडला अभिनेता

Bobby Deol Video: व्हायरल व्हिडीओमध्ये बॉबी ढसाढसा रडताना दिसत आहे.
Published on

Bobby Deol Cried In Front Of The Paparazzi

बॉबी देओल मुख्य भूमिकेत असलेला ‘ॲनिमल’ची सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरु आहे. चित्रपटामध्ये बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटामध्ये बॉबी देओलचे बॉबीनं खलनायकाची भूमिका साकारली आहे. चित्रपटाने तीन दिवसात जवळपास २०० कोटींचा टप्पा गाठला आहे. सध्या सोशल मीडियावर बॉबी देओलचा एक जोरदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये बॉबी ढसाढसा रडताना दिसत आहे.

Bobby Deol Cried In Front Of The Paparazzi
Pillu Bachelor Trailer: 'बाईज ४' नंतर आता 'पिल्लू बॅचलर'मधून पार्थ भालेराव येतोय तुम्हाला हसवायला, चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज

जरीही बॉबी देओलचं खलनायकाचं पात्र असलं तरी, त्याने रणबीरपेक्षा जास्त चित्रपटामध्ये भाव खाल्ला आहे. चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून बॉबी देओल भावूक झाला आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून त्याच्या अभिनयाचं आणि पात्राचं भरभरून कौतुक केलं आहे.

चाहत्यांसह, समीक्षकांकडून आणि अनेक सेलिब्रिटींकडून त्याचं कौतुक होत आहे. एका कार्यक्रमामध्ये, पापाराझीनी बॉबीच्या अभिनयाची स्तुती केली. ती स्तुती ऐकून बॉबीला अश्रू अनावर झाले. पापाराझीने केलेले कौतुक ऐकून त्यांचे आभार सुद्धा मानले.

बॉबीचाहा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. (Bollywood)

Bobby Deol Cried In Front Of The Paparazzi
Animal 3rd Day Collection: बॉक्स ऑफिसवर रणबीरचं राज्य; ‘ॲनिमल’ने तीन दिवसांतच गाठला २०० कोटींचा टप्पा

चित्रपटाला मिळत असलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल चाहत्यांचे हात जोडून आभार मानताना दिसत आहे. पापाराझींसमोर बॉबी देओल हात जोडून म्हणाला, ‘तुमच्या सर्वांचे मी मन:पूर्वक आभार मानतो. चित्रपटालासुद्धा आणि माझ्या भूमिकेलाही तुमच्यांकडून खूप प्रेम मिळत आहे. मिळत असलेला प्रतिसाद आणि प्रेम पाहून मी स्वप्न बघतोय, असं मला वाटतंय.’ अशी त्याने माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे. सध्या चित्रपटातले अनेक सीन्स सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. (Bollywood Film)

Bobby Deol Cried In Front Of The Paparazzi
Chahat Pandey: अभिनयात पास पण राजकारणात नापास; 'आप'कडून निवडणूक लढवणाऱ्या अभिनेत्रीचा दारुण पराभव!

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, चित्रपटाने पहिल्या तीन दिवसातच २०० कोटींचा टप्पा गाठला आहे. चित्रपटाने तिसऱ्या दिवशी ७२. ५० कोटींची कमाई केली आहे. तिसऱ्या दिवसाचा कमाई आकडा पाहता चित्रपटाने रविवारी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून ए रेटिंग मिळाली असली तरी, प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत रणबीर कपूरसह, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि अनिल कपूर आहेत. सर्वच कलाकारांच्या अभिनयाने आणि लूकने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. चित्रपटाची निर्मिती जवळपास १०० कोटींमध्ये झालेली असून पहिल्या दोन दिवसांच्या कमाईतूनच निर्मितीचा खर्च वसूल झाला आहे. (Entertainment News)

Bobby Deol Cried In Front Of The Paparazzi
Junior Mehmood Suffer From Cancer: कॅन्सरशी लढणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक, जॉनी लिव्हरने केली विचारपुस

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com