बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, त्यांना कॅन्सरचे निदान झाले आहे. अशाच एका सेलिब्रिटीला आता कॅन्सरचे निदान झाले आहे. हा बॉलिवूड अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून ‘ब्रह्माचारी’ फेम अभिनेता ज्युनियर महमूद आहे. अभिनेता गेल्या दोन महिन्यांपासून मृत्यूशी झुंज देत आहे. ब्लड प्रेशर आणि शुगर लेव्हल अचानक कमी झाल्यामुळे त्यांचे वजन कमी व्हायला सुरुवात झाली. अशी माहिती, ज्यु. महमूदचा भाऊ सलाम काजीने एका मुलाखतीमध्ये दिली आहे.
ज्युनियर महमूद यांची नोव्हेंबर महिन्यामध्ये हेल्थ चेकअप करण्यात आली होकी. त्यावेळी त्यांना कॅन्सरचे निदान झाले. सध्या ज्युनियर महमूद यांचा चौथ्या स्टेजवर कॅन्सर आहे. यामुळे त्यांची तब्येत फारच खालावली आहे. डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार, ज्युनियर महमूद यांच्यासह त्यांच्या फॅमिलीकडे, शेवटचे ४० दिवस राहिले आहेत. यासाठीच अभिनेता आणि कॉमेडियन जॉनी लिव्हर यांनी ज्यु. मेहमूद यांची भेट घेतली. त्यासोबतच यावेळी त्यांनी ज्यु. मेहमूदच्या तब्येतीची विचारपुस करत एक व्हिडीओ शेअर केला आहे.
जॉनी लिव्हरने ज्यु. मेहमूदच्या घरी जाऊनच त्यांची विचारपूस केली आहे. यांच्या भेटीदरम्यानचा एक व्हिडीओ ‘मुंबई न्यूज’ ह्या पोर्टलच्या सोशल मीडिया प्लॅटफर्म एक्स (ट्वीटर)वरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये, ज्युनियर मेहमूद अशक्त बेडवर आराम करताना दिसत आहेत. त्यांच्या शेजारी जॉनी लिव्हर दिसत आहेत. यावेळी त्यांनी ज्युनियर मेहमूदच्या तब्येतीची विचारपूस केली असून त्यांना जगण्याची एक नवी प्रेरणा देताना ते दिसले.
ज्यु. महमूदचा भाऊ सलाम काजीने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहिती प्रमाणे, ‘सुरुवातीच्या दिवसांमध्ये, ज्यु. महमूदला किरकोळ त्रास होत होता. काही दिवसांनंतर अचानक त्यांच्या वजनामध्ये घट व्हायला लागली. त्यांचं हेल्थ चेकअप केल्यानंतर रिपोर्ट आल्यानंतर त्यांच्या पोटामध्ये गाठ असल्याचे सांगण्यात आले. यकृत, फुफ्फुसात कर्करोग आणि आतड्यात गाठ असल्याचे त्यांना डॉक्टरांनी सांगितले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत..’ ज्युनियर महमूद यांचा कर्करोग चौथ्या स्टेजवर असल्याची माहिती देखील डॉक्टरांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.