Bobby Deol In Animal Movie: ‘ॲनिमल’चा शत्रु कोण?, निर्मात्यांनी शेअर केला आगामी पात्राचा फोटो

Bobby Deol Movie: अभिनेता बॉबी देओलचा ‘ॲनिमल’मधील फर्स्ट लूक समोर आला आहे.
Bobby Deol In Animal Movie
Bobby Deol In Animal MovieInstagram

Bobby Deol In Animal Movie

संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित, ‘ॲनिमल’ची सध्या प्रचंड चर्चा होत आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत राहिलेल्या या चित्रपटाचा टीझर येत्या २८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. अशातच त्याआधी चित्रपटातील एका पात्राची चर्चा होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रणबीर आणि रश्मिका मंदान्नाचा चित्रपटातील लूक समोर आला होता. आता त्यानंतर बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलचा चित्रपटातील फर्स्ट लूक समोर आला आहे.

Bobby Deol In Animal Movie
Dev Anand Love Story: देव आनंद यांना सुरैयासोबत करायचं होतं लग्न, धर्म आडवा आल्याने अधुरी राहिली प्रेम कहाणी

या वर्ष अखेरीस अर्थात १ डिसेंबर रोजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. येत्या २८ सप्टेंबरला अभिनेता रणबीर कपूरचा वाढदिवस आहे, त्याच्या वाढदिवशी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत रणबीर कपूरसह, नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

‘ॲनिमल’च्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून बॉबी देओलचा चित्रपटातला फर्स्ट लूक शेअर करण्यात आला आहे. अभिनेत्याचा हा लूक शेअर करताना, “ॲनिमलचा हा शत्रू” अशा आशयाचे कॅप्शन देत लूक शेअर केला. सध्या अभिनेत्याचे चित्रपटातील पात्राचे नेमके नाव काय आहे, हे सध्या तरी गुलदस्त्यात आहे. फक्त बॉबीच्या पात्राची ओळख केली आहे.

चित्रपटात अनिल कपूर बलबीर सिंग नावाचे पात्र साकारणार आहेत. तर रश्मिका चित्रपटामध्ये गीतांजली नावाचे पात्र साकारणार आहे. चित्रपटातील कॅरेक्टर जस जशे समोर येत आहेत. तसतशे, प्रेक्षकांना चित्रपटाबद्दलची उत्सुकता फारच शिगेला पोहोचली आहे.

Bobby Deol In Animal Movie
Shreyas Talpade In Dagadu Sheth Ganpati: दगडूशेठला जाताना रस्ता भरकटला, बाप्पाच्या रुपात धावून आला ट्राफिक पोलीस; श्रेयस तळपदेने सांगितला अनुभव

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com