Famous Actress : बिग बॉस फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात; बॉयफ्रेंडसोबत घेतले सात फेरे, सुंदर PHOTOS आले समोर

Famous Actress Wedding : बिग बॉस फेम अभिनेत्रीचा शाही विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. लग्न सोहळ्याचे खास फोटो समोर आले आहे.
Famous Actress Wedding
Famous Actress SAAM TV
Published On
Summary

बिग बॉस फेम अभिनेत्री चढली बोहल्यावर

अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ

'आदियोगी' येथे पार पडला लग्न सोहळा

'बिग बॉस ओटीटी २' फेम अभिनेत्री पलक पुरसवानी नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. लग्न सोहळ्याचे खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पलक पुरसवानीने बॉयफ्रेंड रोहन खन्नासोबत 'ईशा योग केंद्रात' लग्नगाठ बांधली. तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील ११२ फूट उंचीच्या आदियोगी पुतळ्यासमोर या जोडप्याने सात फेरे घेऊन आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. हा शाही लग्न सोहळा २६ जून २०२६ रोजी पार पडला.

पलक पुरसवानी आणि रोहन खन्ना यांच्या लग्नाला जवळचे कुटुंबिय, मित्रपरिवार उपस्थित होते. हा एक खाजगी विवाह सोहळा होता. आपल्या खास लग्न सोहळ्यासाठी पलकने बेज आणि लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता, तर रोहनने तिला साजेसा असा शाही पारंपरिक शेरवानीचा पेहराव केला होता. पारंपरिक लेहंग्यासोबत हिरव्या रंगाचे शाही दागिने परिधान केल्यामुळे पलक अतिशय सुंदर दिसत होती.

पलकने शेअर केलेल्या फोटोंमध्ये जोडप्याचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. एका फोटोमध्ये ते एकमेकांचा हात धरून आनंदाने हसताना दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोमध्ये रोहन तिच्या कपाळावर सिंदूर लावताना आणि गळ्यात मंगळसूत्र घालताना दिसत आहे. या फोटोवर चाहते, नेटकरी, कलाकार मंडळी भरभरून कमेंट्चा आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

पलकने या पोस्टला खूपच हटके कॅप्शन दिले आहे. तिने लिहिलं की, "काही प्रेमकथा नियतीने लिहिलेल्या असतात, आमची निवड महादेवाने केली; From two souls, to one forever...२६.०६.२६"

पलक पुरसवानी करिअर

पलक पुरसवानी ही टिव्हीचा प्रसिद्ध चेहरा आहे. तिने 'बडी देवरानी' आणि 'ये रिश्ते हैं प्यार के' यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे, तसेच ती 'बिग बॉस ओटीटी २' आणि 'एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला सीझन ७' यांसारख्या रिअ‍ॅलिटी शोमध्येही झळकली आहे.

Famous Actress Wedding
Famous Actor : बॉलिवूड अभिनेत्याचा भीषण अपघात; १३ फुटांवरून खाली पडला, शस्त्रक्रियाही झाली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com