Manasvi Choudhary
मंगळसूत्र ब्रेसलेट घालण्याची फॅशन सध्या ट्रेंडमध्ये आहे. अनेक तरूण विवाहित मुली हातात मंगळसूत्र ब्रेसलेट घालतात.
तुम्हाला देखील मंगळसूत्र ब्रेसलेट खरेदी करायचं असेल तर युनिक डिझाईन्सचे नवीन पॅटर्न्स तुम्ही ट्राय करू शकता. सध्या मंगळसूत्र ब्रेसलेटचे 5 पॅटर्न्स ट्रेडिंगमध्ये आहेत.
मिनिमलिस्टिक इन्फिनिटी हे मंगळसूत्र डिझाइन अत्यंत साधे आणि नाजूक असते. यात 'इन्फिनिटी' चिन्ह असते. ऑफिसवेअरसाठी हे मंगळसूत्र ब्रेसलेट तुम्ही निवडू शकता.
फ्लोरल मंगळसूत्र ब्रेसलेटमध्ये फुलांची डिझाइन असते, हे मंगळसूत्र ब्रेसलेट अत्यंत नाजूक दिसते. साडी किंवा कुर्तीवर तुम्ही हे घालू शकता.
नेम कस्टमाइज्ड मंगळसूत्र ब्रेसलेटची सध्या विवाहित महिलांमध्ये भलतीच क्रेझ आहे. अनेक महिला स्वतःचे किंवा पतीचे नाव अक्षरांमध्ये ब्रेसलेटवर लिहतात.
लेअर्ड चैन मंगळसूत्र ब्रेसलेट यात दोन किंवा तीन पदरी साखळ्या असतात, ज्यामध्ये काळ्या मण्यांमध्ये तुम्ही मंगळसूत्र डिझाईन करू शकता.
गळ्यातील मंगळसूत्राप्र्माणेच हातीतल मंगळसूत्र ब्रेसलेटला पेंडंट असते, आणि दोन्ही बाजूंना काळे मणी असतात.