पावसाळ्यात नक्की खा 'या' ६ गावरान भाज्या; चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

Manasvi Choudhary

रानभाज्या

पावसाळा सुरू झाला की बाजारात रानभाज्या विकायला येतात. ग्रामीण भागात उंच डोंगरावर, टेकड्यावर उगणाऱ्या या भाज्या मार्केटमध्ये पाहायला मिळतात. या भाज्यांना गावरान भाज्या असे देखील ओळखले जाते.

Monsoon vegetables

आरोग्यासाठी फायदेशीर

गावरान भाज्या केवळ चवीलाच नाहीतर आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. पावसाळ्यातच या भाज्या मिळतात त्यामुळे या खाणे आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते. गावरान भाज्यांमध्ये औषधी गुणधर्म असतात.

Monsoon Wild Vegetables | Saam Tv

गावरान भाज्या कोणत्या?

पावसाळ्या मिळणाऱ्या या गावरान भाज्या कोणत्या आहेत? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Wild Vegetables |

अळू

अळूची भाजी पावसाळ्यात घरोघरी आवर्जून खाल्ली जाते. अळूच्या पानांपासून ही भाजी बनते. अळूमध्ये लोह , कॅल्शियम, व्हिटॅमिन ए ही पोषकघटके असतात ज्यामुळे पचनक्रिया देखील सुधारते. अळूची वडी, अळूचं फदफद या रेसिपी बनवल्या जातात.

Alu Leaves

टाकळा

पावसाळ्यात गवताळ भागात उगवणाऱ्या या भाजीला टाकळा असे म्हणतात. टाकळा भाजी चवदार लागते. टाकळा भाजीचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते.

Takla Bhaji

भारंगी

भारंगी औषधी वनस्पती आहे. या भाजीचे सेवन केल्याने पावसाळ्यातील संसर्ग आजार दूर होतात. भारंगा या भाजीचे देठ आणि पानांची भाजी केली जाते.

Bharangi bhaji

घोळ

घोळ भाजी डाळ घालून बनवली जाते. ही भाजी डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते.

Purslane Vegetable

करटोली

करटोली ही पावसाळ्यात मिळणारी प्रसिद्ध गावरान भाजी आहे. या भाजीचे सेवन केल्याने शरीराला आरोग्यदायी फायदे होतात. रक्तातील साखर नियंत्रणात राहते म्हणून मधुमेह रूग्णांनी या भाजीचे सेवन करणे फायदेशीर आहे.

Kantola

NEXT: पावसाळ्यात ऑफिस आणि रोजच्या वापरासाठी कॉटन-जॉर्जेटच्या 'या' 5 साड्या ठरतील बेस्ट

येथे क्लिक करा..