Manasvi Choudhary
पावसाळ्यात कोणत्या साड्या नेसाव्यात? असा प्रश्न सर्वंच महिलांना पडतो. कॉटन आणि जॉर्जेट साड्या पावसाळ्यात कम्फर्टेबल आणि स्टायलिश दिसतात.
कॉटन आणि जॉर्जेट साडयांचे नवीन लेटेस्ट पॅटर्न बाजारात उपलब्ध आहेत. तुम्हाला देखील या साड्या खरेदी करायच्या असतील तर खालील पॅटर्न्स निवडा.
जॉर्जेट आणि कॉटन साड्या डेली वेअर किंवा ऑफिस वेअर साठी बेस्ट आहेत. या साड्यांचे 5 लेटेस्ट पॅटर्न पाहूया.
लिनन आणि कॉटनच्या साड्या तुम्ही पावसाळ्यात नेसू शकता. या साड्या स्टायलिश आणि कम्फर्टेबल दिसतात. सध्या या साड्यांना महिला पसंती देतात.
तुम्हाला सिंपल लूक पाहिजे असेल तर कलमकारी बॉर्डर पॅटर्न साडी निवडा या साड्या प्लेन असतात साडीवर बारीक चेक्सची डिझाईन असते.
ओम्ब्रे साडीमध्ये दोन किंवा तीन रंगांचे मिक्स डिझाईन या पॅटर्नमध्ये असते. ओम्ब्रे शेड्स हा साडी पॅटर्न युनिक आहे. यामुळे पावसाळ्यात तुमचा लूक स्टायलिश आणि मॉडर्न वाटतो.
हलक्या रंगाच्या जॉर्जेट साडीवर सुंदर फ्लोरल प्रिंट असते. पावसाळ्यात या साड्या अधिक उठून दिसतात. एखाद्या कार्यक्रमात तुम्ही देखील या साड्या निवडू शकता.