Manasvi Choudhary
वातावरणातील बदल, धूळ, माती आणि प्रदूषण यामुळे आजकाल अकाली वृद्धत्व पिंपल्स आणि चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक कमी होते.
यावर उपाय म्हणून अनेकजण महागडे केमिकलयुक्त प्रोडक्ट्स वापरतात मात्र याचा परिणाम फारसा दिसत नाही. यासाठी तुम्ही घरगुती 'हर्बल फेस मास्क' बनवा.
फेसमास्क बनवण्यासाठी गुलाब पाकळ्या, संत्र्याच्या सालीची पावडर, तांदळाचे पीठ, मसूर डाळ, बेसन, चंदन पावडर हे साहित्य एकत्र करा.
सर्वात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये गुलाब पाकळ्यांची पावडर, संत्र्याच्या सालीची पावडर, तांदळाचे पीठ, मसूर डाळ पावडर, बेसन आणि चंदन पावडर हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करा.
साधारण १० ते १५ मिनिटे फेस मास्क चेहऱ्यावर ठेवा त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि चेहरा धुतल्यानंतर हलके मॉइश्चरायझर किंवा हायड्रेटिंग क्रिम लावा यामुळे त्वचेवर ओलावा राहील.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्य.