मोबाईल फोन १०० टक्के चार्ज करावा की नाही?

Manasvi Choudhary

मोबाईल फोनची काळजी

मोबाईल फोन हा आपल्या सर्वासाठी अत्यंत महत्वाचा आहे. पण अनेकदा चुकीच्या पद्धतीने चार्जिंग केल्यामुळे फोनची बॅटरी लवकर खराब होते.

Phone Charging Tips

फोनची चार्जिंग किती करावी?

प्रत्येक मोबाईल फोनमध्ये बॅटरी असते. मोबाईल फोनमध्ये बॅटरी असली तरी ती चार्जिंग केलेली असावी हे तितकच महत्वाचे आहे. अनेकांना फोनची बॅटरी १०० टक्के की त्याहून कमी किती चार्जिंग करावी? असा प्रश्न पडतो.

Phone Charging Tips

फोन चार्ज करण्याची योग्य पद्धत

फोनची बॅटरी दिर्घकाळ टिकावी यासाठी केवळ बॅटरी चार्ज करण्याची पद्धत नाही तर काही छोट्या सवयी देखील महत्वाच्या आहेत. फोन १०० टक्के चार्ज करणे चुकीचे मानले जाते त्यामुळे बॅटरीचा स्फोट होण्याचा धोका अधिक असतो.

Phone Charging Tips

फोन १००% चार्ज करणे खरोखरच चुकीचे आहे का?

फोन १००% चार्ज केल्याने बॅटरीवर जास्त ताण पडतो आणि फोन गरम होतो. जास्त उष्णतेमुळे बॅटरी फुगणे बॅटरीचा स्फोट होण्याचा धोका अधिक असतो.

Phone Charging Tips

फोनची बॅटरी किती असावी?

फोनची बॅटरी नेहमी २०% ते ८०% किंवा जास्तीत जास्त ८५% च्या दरम्यान ठेवणे बॅटरी हेल्थसाठी सर्वात उत्तम मानले जाते. यामुळे बॅटरी हेल्थ खराब होत नाही. फोन जास्त काळ टिकतो.

Phone Charging Tips

ओव्हरचार्जिंग

बऱ्याच लोकांना रात्री फोन चार्जिंगला लावून झोपण्याची सवय असते मात्र ही सवय अधिक चुकीची आहे.

Overcharging | saam tv

बॅटरी दीर्घकाळ टिकवण्यासाठी ही सेंटिग करा

फोनची बॅटरी हेल्थ चांगली राहण्यासाठी फोनच्या बॅटरी प्रोटेक्शनमध्ये चार्ज लिमिट हे पर्याय ऑन करा यामुळे फोन बॅटरीला एका मर्यादेच्या पुढे चार्ज होऊ देत नाही, ज्यामुळे बॅटरी सुरक्षित राहते.

Phone Charging Tips | yandex

असा होतो फायदा

अँड्रॉइड आणि आयफोनमध्ये हे फीचर असते. हे सेटिंग ऑन केल्यास फोन ८0% किंवा ८५% चार्ज झाला की चार्जिंग आपोआप थांबते.

Overcharging

NEXT: 'तु जणू सौंदर्याची राणी' प्रियदर्शनीचे फोटो पाहून चाहत्यांच्या काळजाची धडधड वाढली

Actress Priyadarshini Indulkar | Instagram @Priyadarshini Indulkar
येथे क्लिक करा...