Suraj Chavan kelvan : बिग बॉसचा हिरो चढणार बोहल्यावर; अंकिताच्या घरी थाटात पार पडलं केळवण, होणारी बायको आहे तरी कोण?

Suraj Chavan Wife : अंकिता वालावलकरने सूरज चव्हाणचे थाटात केळवण केले आहे. ज्याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. सूरजने होणाऱ्या बायकोची झलक चाहत्यांना दाखवली आहे.
Suraj Chavan Wife
Suraj Chavan kelvanSAAM TV
Published On
Summary

'बिग बॉस मराठी 5' विजेता सूरज चव्हाण लवकरच लग्न बंधात अडकणार आहे.

अंकिता वालावलकरने सूरज चव्हाणचे केळवण केले आहे.

सूरज चव्हाणने होणाऱ्या बायकोचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे.

'बिग बॉस मराठी 5'मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेला सूरज चव्हाण आता लवकरच बोहल्यावर चढणार आहे. सूरजच्या घरी लगीन घाई पाहायला मिळत आहे. नुकतेच सूरज चव्हाणचे केळवण पार पडले आहे. तसेच सूरज चव्हाणने आपल्या बायकोचा चेहरा देखील दाखवला आहे. सूरज चव्हाणची होणारी नवरी कोण असणार, हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. अखेर सूरजने आपल्या होणाऱ्या बायकोची ओळख करून दिली आहे.

सूरज चव्हाणचे केळवण 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरच्या घरी पार पडले आहे. अंकिताने याचा खास फोटो शेअर केला आहे. ज्यात सूरज आणि त्याची होणारी बायको अंकिताच्या घरी येता. अंकिता सूरज आणि त्याच्या बायकोचे औक्षण करते. त्यानंतर दोघेही छान उखाणा घेतात. अंकिताच्या घरी बनवलेल्या मेजवानीचा आस्वाद घेतात. सूरज चव्हाणच्या बायकोचं नाव संजना असे आहे. दोघे एकत्र खूपच छान दिसतात.

सूरज उखाणा घेत म्हणतो की, "बिग बॉस जिंकून झालं माझं पूर्ण स्वप्न, संजनाचं नाव घेतो... बोलो होतो ना आधी करिअर मग लग्न" त्यानंतर संजना उखाणा घेते की, "बिग बॉसचा विनर झाला माझ्या प्रेमात सायको, सूरज रावांचं नाव घेते मीच त्यांची होणारी बायको!" अंकिताने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहते सूरज चव्हाणला शुभेच्छा देताना दिसत आहेत.

अंकिता वालावलकरने व्हिडीओला "सूरजचं केळवण" असे कॅप्शन दिलं आहे. अंकिताने केळवणासाठी घर सजवलेले पाहायला मिळत आहे. केळीच्या पानांची, फुलांची सजावट पाहायला मिळत आहे. तसेच आता चाहते सूरज चव्हाणच्या लग्नाची तारीख जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी 5' चा विजेता ठरला होता. त्यानंतर त्याचा 'झापुक झुपूक' चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला आला.

Suraj Chavan Wife
Bigg Boss 19 : अमाल मलिकने तान्या मित्तलला रडवलं; प्रणित मोरेनंतर 'हा' सदस्य बनवा नवा कॅप्टन, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com