Akshay Kelkar : 'बिग बॉस' विजेत्याच्या घरी लगीनघाई; नुकतेच पार पडले केळवण, पाहा PHOTOS

Akshay Kelkar Kelvan : नुकतेच अभिनेता अक्षय केळकरचे केळवण पार पडले आहे. त्याच्या केळवणाचे सुंदर फोटो पाहा. अक्षय लवकरच आपल्या गर्लफ्रेंडसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.
Akshay Kelkar Kelvan
Akshay KelkarSAAM TV
Published On

नवीन वर्षात मनोरंजन सृष्टीत अनेक कलाकारांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली तर काहींनी लग्नगाठ बांधली आहे. अशात आता 'बिग बॉस मराठी 4' चा विजेता प्रसिध्द अभिनेता अक्षय केळकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतेच त्याचे पहिले केळवण पार पडले आहे. अलिकडेच अक्षय केळकरने (Akshay Kelkar) आपल्या नात्याची कबुली देऊन त्यांच्या गर्लफ्रेंडची ओळख चाहत्यांना करून दिली होती.

akshay kelkar
akshay kelkarinstagram

अक्षय केळकरच्या आयुष्यातील 'रमा' म्हणजे त्याची मैत्रीण साधना काकतकर आहे. सध्या अक्षयच्या घरात लगीनघाई पाहायला मिळत आहे. अक्षय केळकर मे महिन्यात लग्नगाठ बांधणार आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. अक्षय केळकरच्या जवळच्या मैत्रिणीने नुकतेच त्यांचे केळवण खास पद्धतीत पार पाडले आहे. अक्षयची ही खास मैत्रीण दुसरी तिसरी कोणी नसून लोकप्रिय मराठी अभिनेत्री समृद्धी केळकर (Samruddhi Kelkar) आहे.

अक्षय आणि साधनासाठी समृद्धी केळकरने खूप खास बेत आखला होता. यात आमरस पुरी आणि बटाट्याची भाजी पाहायला मिळत आहे. फुलांनी तिने घरी सजावट केली आहे. तर केळीच्या पानावर 'अक्षय-साधनाचं केळवण' असे लिहिलं आहे. तिने अक्षयच्या केळवणाचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

akshay kelkar
akshay kelkarinstagram

अक्षय केळकर आणि समृद्धी केळकर हे छान मित्र आहेत. त्यांनी अनेक कामे एकत्र केली आहेत. त्यांची 'दोन कटींग' ही सीरिज चाहत्यांना तर खूप आवडली. याला चांगला प्रतिसाद देखील मिळाला. तर अक्षय केळकरल खरी ओळख 'बिग बॉस मराठी 4' मधून मिळाली. घरातील त्याचा वावर, त्याची खेळ खेळण्याची पद्धत चाहत्यांना खूप आवडली. त्याने अनेक हिट मालिका केल्या आहेत. लवकरच तो 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Akshay Kelkar Kelvan
Mugdha Chaphekar : भुला देना मुझे..., 'कुमकुम भाग्य' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, ९ वर्षानंतर झाले वेगळे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com