Ankita Walawalkar : कचऱ्याचा ढीग पाहून अंकिता वालावलकर संतापली; म्हणाली- "गेटवर नाव महाराजांचं,पण..."

Ankita Walawalkar Post: 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराजवळ कचऱ्याचा डिग पाहायला मिळत असल्यामुळे तिचा संताप झाला आहे.
Ankita Walawalkar Post
Ankita WalawalkarSAAM TV
Published On
Summary

अंकिता वालावलकर 'कोकण हार्टेड गर्ल' म्हणून ओळखली जाते.

अंकिताने सोशल मीडियावर पोस्ट करून नाराजी व्यक्त केली आहे.

नांदगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराजवळ कचऱ्याचा डिग पाहायला मिळाला.

'बिग बॉस मराठी 5' (Bigg Boss Marathi 5) फेम 'महाराष्ट्र हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिने बिग बॉसचे 5 पर्व तुफान गाजवले . 'कोकण हार्टेड गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंकिताला आता 'महाराष्ट्र हार्टेड गर्ल' म्हणून ओळखले जाते. तिचा बिग बॉसमधील गेम चाहत्यांना खूप आवडला. अंकिता हे बिनधास्त व्यक्तिमत्त्व आहे. कायम आपली मते सोशल मीडियाच्या माध्यमातून परखडपणे मांडताना ती दिसते.

अंकिता वालावलकरने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने एका महत्त्वाच्या विषयावर आपले मत मांडले आहे. तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने नांदगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार दाखवले (The Chhatrapati Shivaji Maharaj gate Nandgaon) आहे. मात्र प्रवेशद्वाराजवळ कचऱ्याचा डिग पाहायला मिळत आहे. ज्यामुळे अंकिताचा संताप झाला आहे. यावर तिने एक पोस्ट केली आहे. ती नेमकं काय म्हणाली जाणून घेऊयात.

अंकिता वालावलकर पोस्ट

"गेटवर नाव महाराजांचं…पण समोरचं दृश्य लाजिरवाणं!

एक लक्षात घ्या इतिहास फक्त पुस्तकांत नसतो, तो आपल्या आजूबाजूच्या जागांमध्येही असतो.

छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही तर आपल्या अस्मितेचं प्रतीक आहेत. त्यांच्या नावाचा उल्लेख जिथे होतो, तिथे आपोआपच अभिमान आणि आदराची भावना जागी होते. परंतु आज अनेक ठिकाणी "शिवाजी महाराज चौक", "शिवाजी महाराज गेट" अशा ऐतिहासिक नावांखाली असलेल्या जागांभोवती घाण, कचरा, निष्काळजीपणा आणि बेफिकिरीचं दु:खद चित्र दिसून येतं. किती विसंगती आहे ही, एकीकडे महाराजांचा जयघोष, दुसरीकडे त्यांच्या नावाजवळच साचलेला कचरा! हे फक्त त्या जागेचं नाही, तर आपल्या मानसिकतेचेही द्योतक आहे.

शिवरायांच्या विचारांनी चालणं म्हणजे फक्त गड किल्ले बघणं नव्हे, तर स्वच्छता, शिस्त आणि सजग नागरिकत्व हे त्यांच्या आदर्शाचं खरे अनुकरण आहे. मग आपण रोज ज्या गेटखालून पाटीला नमस्कार करतो, तिथं जर आपणच प्लास्टिक, घाण, थुंकी आणि कचऱ्याचा ढीग ठेवत असू तर तो नमस्कार केवळ दिखावा आहे का? आज गरज आहे ती फक्त "शिवप्रेम" बोलण्यात नसून, ते कृतीत दाखवण्याची. "गेटवर महाराजांचं नाव, पण समोर कचरा हा अपमान नाही का आपल्या इतिहासाचा?"

आपण जर खरंच शिवरायांवर प्रेम करत असू तर त्यांच्या नावाने असलेल्या प्रत्येक स्थळाला म्हणजेच आपल्या महाराष्ट्राला स्वच्छ आणि सन्माननीय ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. समाज, नगरपालिका आणि स्थानिक नागरिक सर्वांनी मिळून हे लक्षात घ्यायला हवं. शिवरायांचे नाव म्हणजे शौर्य, स्वच्छता आणि स्वाभिमान. तो आपल्या कृतीनं दाखवूया! महाराजांच्या नावाने असलेल्या गेटसमोर कचरा दिसणं हे आपण सर्वांनी विचार करावा अशी गोष्ट आहे. स्वतः कचरा न टाकणे आणि इतरांनाही रोखणे हीच खरी शिवप्रेमाची ओळख. "

Ankita Walawalkar Post
Nysa Devgan : अजय देवगन-काजोलची लाडकी लेक झाली ग्रॅज्युएट, नीसाच्या पदवी प्रदान समारंभाचा VIDEO समोर
Q

अंकिता वालावलकरला कोणत्या नावाने ओळखले जाते?

A

कोकण हार्टेड गर्ल

Q

अंकिता बिग बॉसच्या कोणत्या सीझनमध्ये दिसली?

A

बिग बॉस मराठी 5

Q

अंकिताने कोणत्या विषयावर व्हिडीओ शेअर केला आहे?

A

नांदगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराजवळील कचऱ्याचा डिग पाहून अंकिताने नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com