Nysa Devgan : अजय देवगन-काजोलची लाडकी लेक झाली ग्रॅज्युएट, नीसाच्या पदवी प्रदान समारंभाचा VIDEO समोर

Ajay Devgan Kajol daughter Nysa Devgan Graduation : बॉलिवूड कपल अजय देवगन-काजोलची लेक नीसा देवगन ग्रॅज्युएट झाली आहे. नीसाच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Ajay Devgan Kajol daughter Nysa Devgan Graduation
Nysa DevganSAAM TV
Published On
Summary

अजय आणि काजोलची लेक नीसा देवगन ग्रॅज्युएट झाली आहे.

ग्रॅज्युएशन सेरेमनीला अजय आणि काजोल गेले होते.

नीसाच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

बॉलिवूड अभिनेता अजय देवगन (Ajay Devgan ) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'सन ऑफ सरदार 2'मुळे चांगलाच चर्चेत आहे. मात्र आता अजय देवगण एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. अजय आणि काजोलची (Kajol) लेक नीसा देवगन (Nysa Devgan) ग्रॅज्युएट झाली आहे. नीसाच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अजय आणि काजोलसाठी हा आनंदाचा क्षण आहे.

नीसाच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीला अजय देवगन आणि काजोल गेले होते. नीसाने स्वित्झर्लंडच्या ग्लियन इंस्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन येथे शिक्षण घेतले आहे. तिने International Hospitality पदवी मिळवली आहे. वयाच्या 22 व्या वर्षी नीसा ग्रॅज्युएट झाली आहे. व्हिडीओमध्ये नीसा देवगन आपली पदवी घेताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत आहे. सध्या नीसा देवगनवर चाहते आणि मित्रपरिवाराकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

'सन ऑफ सरदार 2' रिलीज डेट

अजय देवगन लवकरच 'सन ऑफ सरदार 2'मुळे (Son Of Sardaar 2)मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सन ऑफ सरदार 2'मधून अजय देवगनसोबत अभिनेत्री मृणाल ठाकुर झळकणार आहे. 'सन ऑफ सरदार 2' चित्रपट 1 ऑगस्टला रिलीज होणार आहे. चित्रपटात ॲक्शन, कॉमेडी आणि ड्रामा पाहायला मिळणार आहे. 'सन ऑफ सरदार 2' हा 2012 साली रिलीज झालेल्या 'सन ऑफ सरदार'चा सीक्वल आहे.

'सन ऑफ सरदार 2' स्टारकास्ट

'सन ऑफ सरदार 2'मध्ये अजय देवगण, मृणाल ठाकूरसोबत नीरू बाजवा, विंदू दारा सिंह, रवी किशन आणि शरत सक्सेना हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. चाहते चित्रपटासाठी खूप उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. चित्रपटाची गाणी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Ajay Devgan Kajol daughter Nysa Devgan Graduation
Vijay Deverakonda : विजय देवरकोंडाची कडक ॲक्शन; 'किंगडम'चा जबरी ट्रेलर, पाहा VIDEO
Q

अजय- काजोलच्या लेकीचे नाव काय?

A

नीसा देवगन

Q

नीसाने कोणती पदवी घेतली?

A

International Hospitality

Q

नीसा देवगन किती वर्षांची आहे?

A

22

Q

अजय देवगनचा आगामी प्रोजेक्ट कोणता?

A

सन ऑफ सरदार 2'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com