Vijay Deverakonda : विजय देवरकोंडाची कडक ॲक्शन; 'किंगडम'चा जबरी ट्रेलर, पाहा VIDEO

Kingdom Trailer Released : साऊथ अभिनेता विजय देवरकोंडा 'किंगडम' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. नुकताच चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
Kingdom Trailer Released
Vijay Deverakonda SAAM TV
Published On
Summary

साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा 'किंगडम'चा हिरो आहे.

'किंगडम' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे.

'किंगडम' चित्रपट 31 जुलैला रिलीज होणार आहे.

साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'किंगडम'मुळे चांगलाच चर्चेत आहे. 'किंगडम'मधून विजय एका हटके अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच 'किंगडम'चा (Kingdom ) धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. निर्मात्यांनी हिंदीत चित्रपटाचे नाव 'साम्राज्य' (saamrajya ) असे ठेवले आहे. 'किंगडम' ही गुप्तहेराची कथा आहे.

'किंगडम'मध्ये विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत आहे. 'किंगडम'ॲक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. ट्रेलरमधील विजयचा किलर लूक पाहायला मिळत आहे. त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे. रविवारी 'किंगडम'चा ट्रेलर हिंदीत रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन गौतम तिन्नानुरी यांनी केले आहे.'किंगडम'च्या ट्रेलरमध्ये जबरदस्त डायलॉग पाहायला मिळत आहे. तर विजय देवरकोंडा ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहे.

'किंगडम' स्टारकास्ट

'किंगडम'मध्ये विजय देवरकोंडासोबत तगडे कलाकार पाहायला मिळणार आहेत. यात सत्यदेव, रामावथ चिंटू, भाग्यश्री बोरसे, मनीष चौधरी, बाबुराज यांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'किंगडम' 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. 'किंगडम' चित्रपट 31 जुलैला थिएटरमध्ये पाहता येणार आहे.

'किंगडम' ओटीटी रिलीज

विजय देवरकोंडाच्या 'किंगडम' चित्रपटाचे ओटीटी राइट्स नेटफ्लिक्सने खरेदी केले आहे. थिएटर गाजवल्यावर 'किंगडम' नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. नेटफ्लिक्सने 'किंगडम'चे ओटीटी राइट्स 50 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. मात्र अद्याप 'किंगडम'च्या ओटीटी रिलीजची तारीख जाहीर झाली नाही.

Kingdom Trailer Released
Rutuja Bagwe : ऋतुजा बागवेची नवी इनिंग! सुरू केलं स्वत:चं रेस्टॉरंट, लोकेशन काय?
Q

विजय देवरकोंडाच्या आगामी चित्रपटाचे नाव काय?

A

किंगडम

Q

'किंगडम'चे हिंदी भाषेतील चित्रपटाचे नाव काय?

A

साम्राज्य

Q

'किंगडम' कधी रिलीज होणार?

A

31 जुलै

Q

'किंगडम'चा हिरो कोण?

A

विजय देवरकोंडा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com