Surabhi Jayashree Jagdish
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होन हे सोन्याचे नाणं होतं आणि ते स्वराज्यातील प्रमुख चलनांपैकी एक होतं.
आजच्या रुपयांमध्ये त्याची नेमकी किंमत काढणं काहीसं कठीण आहे. याचं कारण म्हणजे कारण तत्कालीन आर्थिक परिस्थिती, सोन्याची किंमत, खरेदीची शक्ती आणि आजच्या चलनाचं मूल्य यात खूप फरक आहे.
शिवाजी महाराजांच्या काळात एका सुवर्ण होनाची किंमत साधारणपणे ३ ते ४ रुपये होती.
आजच्या सोन्याच्या दराचा विचार केल्यास एका होनाचे सोन्याचे मूल्य सुमारे २१,००० ते २६,२५० रुपये इतके असू शकते.
ही केवळ सोन्याच्या वजनानुसार असलेली किंमत आहे, खरेदीनुसार नाही.
सध्या शिवकालीन 'होन' नाणी अत्यंत दुर्मिळ आहेत. केवळ काही मोजके होन आजही उपलब्ध आहेत.
नाणे संग्राहकांच्या बाजारात किंवा लिलावात या दुर्मिळ नाण्यांना लाखो रुपये मिळतात. काही सुवर्ण होनांची किंमत ₹१५ लाख ते ₹३३ लाख पर्यंत असल्याचेही उल्लेख आढळतात.