Dhule Tourism: पावसाळ्यात गर्दी नसलेल्या शांत ठिकाणी फिरायचंय? धुळ्यातील या ५ Hidden जागांना नक्की भेट द्या

Surabhi Jayashree Jagdish

धुळे जिल्हा

धुळे जिल्हा हा महाराष्ट्राच्या उत्तर भागात वसलेला असून, सातपुडा पर्वतरांगांच्या सान्निध्यात असल्यामुळे पावसाळ्यात इथलं निसर्गसौंदर्य अधिकच खुलतं.

पर्यटन

हिरवीगार डोंगररांगा, धबधबे आणि ऐतिहासिक किल्ले यामुळे पावसाळ्यात धुळ्यातील पर्यटन एक वेगळाच अनुभव आहे.

अलालदरी धबधबा (Alaldari Waterfall)

साक्री तालुक्यात आमली गावाजवळ वसलेला हा धबधबा पावसाळ्यात अत्यंत आकर्षक दिसतो. पावसाळ्यात इथल्या पाण्याचा प्रवाह खूपच मनमोहक असतो.

अनेर धरण अभयारण्य (Aner Dam Sanctuary)

शिरपूर तालुक्यात अनेर नदीजवळ असलेले हे अभयारण्य सुमारे ८३ चौ. किमी. क्षेत्रात पसरलंय. पावसाळ्यात संपूर्ण परिसर हिरवागार होतो आणि वन्यजीव व पक्षी निरीक्षणासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

नवादेवी धबधबा (Navadevi Waterfall)

शिरपूर तालुक्यातील बोराडीजवळ कोडीद गावाजवळ असलेला हा धबधबा पावसाळ्यात प्रवाहित होतो आणि निसर्गरम्य वातावरणामुळे पर्यटकांना आकर्षित करतो. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेली ही जागा हिरवीगार वनराईने नटलेली असते.

नकाणे तलाव आणि धरण

धुळे शहरापासून जवळच असलेला नकाणे तलाव हा निसर्गप्रेमींसाठी एक सुंदर आणि शांत ठिकाण आहे. हिरव्यागार वनश्रीने वेढलेला हा तलाव जैवविविधतेने समृद्ध आहे.

लळिंग किल्ला

धुळे शहरापासून जवळच असलेल्या गाळणा टेकड्यांवर हा ऐतिहासिक किल्ला आहे. पावसाळ्यात किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर हिरवागार होतो आणि किल्ल्यावर ट्रेकिंगचा आनंद घेता येतो.

Malad Tourism : लांब कशाला, पावसाळ्यात मालाडजवळच फिरा 'ही' ठिकाणं; आताच नोट करा लोकेशन

Malad
येथे क्लिक करा