Bigg Boss 19 : अमाल मलिकने तान्या मित्तलला रडवलं; प्रणित मोरेनंतर 'हा' सदस्य बनवा नवा कॅप्टन, पाहा VIDEO

Bigg Boss 19 New Captain : बिग बॉसच्या घरात नवीन कॅप्टन ठरला आहे. तसेच अमाल मलिक आणि तान्या मित्तलच्या मैत्रीत दुरावा आला आहे. घरात नेमकं चालू काय, जाणून घेऊयात.
Bigg Boss 19 New Captain
Bigg Boss 19SAAM TV
Published On
Summary

अमाल मलिक आणि तान्या मित्तलचे बिग बॉसच्या घरात मोठे भांडण होते.

प्रणित मोरेनंतर बिग बॉसच्या घराला नवीन कॅप्टन भेटला आहे.

बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सी टास्क पार पडला आहे.

'बिग बॉस 19'च्या (Bigg Boss 19) घरात नुकताच कॅप्टन्सी टास्क पार पडला आहे. यातही घरातून सदस्य खूप धुमाकूळ घालताना दिसत आहेत. अशात अमाल मलिक आणि तान्या मित्तलच्या नात्यात दुरावा आल्याचे पाहायला मिळत आहे. टास्कमध्ये अमाल मलिकच्या बोलण्याने तान्या मित्तल खूप दुखावते आणि रडायला लागते. अमाल मलिक तान्याला तिच्या गेम वरून खूप सुनावतो. 'बिग बॉस 19'च्या सुरुवातीपासून अमाल आणि तान्या यांच्या नात्याची चर्चा पाहायला मिळत आहे.

कॅप्टन्सी टास्क

'बिग बॉस 19'च्या घरात या आठवड्यात कॅप्टन्सी टास्क थोडा हटके स्टाइलमध्ये पार पडला. संगीत खुर्चीप्रमाणे हा खेळ खेळला गेला. यात चौकोनी ब्लॉकवर चालताना संगीत थांबल्यानंतर जर 2 स्पर्धक एकाच चौकोनी ब्लॉकवर असतील तर दोघेही शर्यतीतून बाहेर जातील. असे होते. पहिल्या फेरीत तान्या मित्तल आणि शाहबाज बदेशा, दुसऱ्या फेरीत फरहाना भट्ट आणि मृदुल तिवारी, तिसऱ्या फेरीत नीलम गिरी आणि अभिषेक बजाज, चौथ्या फेरीत गौरव खन्ना आणि मालती चहर आणि पाचव्या फेरीत अशनूर कौर आणि कुनिका हे बाद झाले.

नवीन कॅप्टन कोण?

गेल्या आठवड्यात प्रणित मोरे 'बिग बॉस 19'च्या घराचा कॅप्टन होता. मात्र अचानक त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्याला खेळामधून बाहेर जावे लागले आहे. बिग बॉसची माहिती देणाऱ्या सोशल मीडिया पेज अनुसार, प्रणित मोरेनंतर अमाल मलिक 'बिग बॉस 19'च्या घराचा नवा कॅप्टन झाला आहे. अमालने यापूर्वी देखील घरातील कॅप्टन्सी सांभाळली आहे. आता, त्याच्याकडे पुन्हा एकदा कॅप्टनसीची ताकद आली आहे.

पुन्हा घराचा कॅप्टन झाल्यावर आता अमाल मलिक काय काय करतो हे येणाऱ्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. तसेच या आठवड्यात 'वीकेंड का वार' चांगलाच गाजणार आहे. या आठवड्यात बाहेर जाण्यासाठी पाच सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यात फरहाना भट्ट, गौरव खन्ना, नीलम गिरी, अभिषेक बजाज आणि अशनूर कौर यांचा समावेश आहे. आता कोण घरात राहणार आणि कोण बाहेर जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Bigg Boss 19 New Captain
Amitabh Bachchan : पैसाच पैसा! बिग बींनी मुंबईतील 2 लग्जरी फ्लॅट्स विकले, नफा वाचून थक्क व्हाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com