Amitabh Bachchan : पैसाच पैसा! बिग बींनी मुंबईतील 2 लग्जरी फ्लॅट्स विकले, नफा वाचून थक्क व्हाल

Amitabh Bachchan Sells Property : बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील आलिशान प्रॉपर्टी विकली आहे. त्यांना किती कोटींचा नफा झाला, जाणून घेऊयात.
Amitabh Bachchan Sells Property
Amitabh BachchanSAAM TV
Published On
Summary

अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील दोन लग्जरी फ्लॅट्स विकले आहेत.

अमिताभ बच्चन यांचे फ्लॅट्स गोरेगाव मुंबई येथे होते.

अमिताभ बच्चन यांना फ्लॅट्स विकून कोट्यवधींचा नफा झाला आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यांनी मुंबईतील आलिशान प्रॉपर्टी विकली आहे. त्यांनी मुंबई गोरेगाव येथील दोन लग्जरी फ्लॅट्स विकले आहेत. आजवर अमिताभ बच्चन यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या ते 'कौन बनेगा करोडपती' चे होस्टिंग करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार,कौन बनेगा करोडपती (केबीसी) च्या एका एपिसोडसाठी ते 5 कोटी रुपये फी घेतात.

मीडिया रिपोर्टनुसार, मुंबईतील फ्लॅट्सचा व्यवहार तब्बल 12 कोटी रुपयांना झाला आहे. प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनच्या कागदपत्रांमधील माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांनी 2012 ला हे लग्जरी फ्लॅट्स 8.12 कोटी रुपयांना विकत घेतले होते. आता 13 वर्षांनी त्यांनी ही प्रॉपर्टी विकली आहे. ज्यामुळे त्यांना तब्बल 47% चा मोठा नफा झाला आहे. हे दोन्ही फ्लॅट्स मुंबईत गोरेगाव ईस्ट येथे ओबेरॉय एक्सक्विझिट बिल्डिंगच्या 47 व्या मजल्यावर होते.

मीडिया रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांनी दोन्ही फ्लॅट्स 6 कोटी रुपयांना विकले. तसेच दोन्ही फ्लॅट्सना प्रत्येकी 30 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि 30,000 रुपये रजिस्ट्रेशन फी लागली. एका फ्लॅटचा व्यवहार 31 ऑक्टोबर 2025ला तर दुसऱ्या फ्लॅटचा व्यवहार 1 नोव्हेंबरला झाला आहे. दोन्ही फ्लॅट्सना चार कार पार्किंग एरिया आहे.

Amitabh Bachchan Sells Property
गौरव खन्ना की अमाल मलिक कोण उचलणार 'Bigg Boss 19'ची ट्रॉफी? सोशल मीडियावर कुणाच्या नावाची चर्चा

अलिकडेच अमिताभ बच्चन यांनी मुंबईजवळील अलिबागमध्ये तीन आलिशान प्लॉट खरेदी केली आहे. ज्याची किंमत सुमारे 6.6 कोटी रुपये आहे. अमिताभ बच्चन यांनी लेक अभिषेक बच्चनसोबत मिळून ही मालमत्ता खरेदी केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती 1,630 कोटी रुपयांच्या वर आहे.

Amitabh Bachchan Sells Property
Bollywood Famous Actor : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचे तरुण अभिनेत्रींसोबत प्रेमसंबंध; पत्नीने केली हेरगिरी, गुप्तहेराचा खुलासा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com