गौरव खन्ना की अमाल मलिक कोण उचलणार 'Bigg Boss 19'ची ट्रॉफी? सोशल मीडियावर कुणाच्या नावाची चर्चा

Bigg Boss 19 Winners List Leaked : सलमान खानचा लोकप्रिय शो 'बिग बॉस 19' बद्दलची मोठी अपडेट समोर आली आहे. विजेत्यांची यादी असलेली पोस्ट इंटरनेटवर व्हायरल होत आहे. टॉप 5 फायनलिस्ट कोण, जाणून घेऊयात.
Bigg Boss 19 Winners List Leaked
Bigg Boss 19SAAM TV
Published On
Summary

सलमान खानचा 'बिग बॉस 19' हा लोकप्रिय रिअलिटी शो आहे.

'बिग बॉस 19'मधून प्रणित मोरेची एक्झिट झाली आहे.

'बिग बॉस 19'च्या टॉप 5 फायनलिस्टची यादी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'बिग बॉस 19'चा (Bigg Boss 19) गेम आता शेवटच्या टप्प्यावर आला आहे. सोशल मीडियावर 'बिग बॉस 19'चा विजेता कोण असणार याची चर्चा पाहायला मिळत आहे. अलिकडेच प्रणित मोरेला तब्येत ठीक नसल्यामुळे बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागला आहे. अशात सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये 'बिग बॉस 19'च्या विजेत्याचे आणि टॉप 5 स्पर्धकांची नावे दिसत आहेत.

'बिग बॉस 19'च्या घरात सुरुवातीपासून काही सदस्य आपला दमदार खेळ दाखवताना दिसत आहे. तर काही सदस्य शांत राहून आपली खेळी खेळत आहेत. संपूर्ण सीझनमध्ये गायक अमाल मलिक आणि तान्या मित्तल चर्चेत राहिला आहे. तान्या आपल्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्याने तर अमाल शिव्या, तान्या आणि मालतीसोबतचे नाते यांमुळे चर्चेत आहे. मात्र शांत राहून, वेळ प्रसंगी आपला खेळ दाखवून सर्वांच्या मनात घर करणारा स्पर्धक म्हणजे गौरव खन्ना.

व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये विजेत्यांची लिस्ट पाहायला मिळत आहे. त्यात गौरव खन्ना 'बिग बॉस 19' विजेता असणार असल्याचे पाहायला मिळत आहे. तर अमाल मलिक तिसरा रनर-अप असणार आहे. 'बिग बॉस 19'च्या घरात टॉप पाच स्पर्धक कोण असतील जाणून घेऊयात.

instagram
instagraminstagram
  • गौरव खन्ना - विजेता

  • अभिषेक बजाज - पहिला रनर-अप

  • फरहाना भट्ट -दुसरा रनर-अप

  • अमाल मलिक - तिसरा रनर-अप

  • तान्या मित्तल - चौथा रनर-अप

मात्र 'बिग बॉस 19' विजेता नेमका कोण असणार हे लवकरच होणाऱ्या ग्रँड फिनालेला पाहायला मिळणार आहे. मात्र अद्याप असे कोणत्याही टॉप पाच स्पर्धकांची अधिकृतपणे माहिती समोर आली नाही. या व्हायरल पोस्टवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. काही लोक गौरव खन्ना झाला तर चांगलेच आहे. आनंदाची गोष्ट आहे. अशा कमेंट्स करत आहेत. तर दुसरीकडे अमालच्या चाहत्यांना त्याला विजेता झालेले पाहायचे आहे.

Bigg Boss 19 Winners List Leaked
Shah Rukh Khan : शाहरुख खानने 'किंग' चित्रपटात ब्रॅड पिटचा लूक केलाय कॉपी? दिग्दर्शकांनी दिलं सोडेतोड उत्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com