'Bigg Boss 19' च्या घरात तान्या मित्तल ढसाढसा रडली, नेमकं कारण काय? पाहा VIDEO

Bigg Boss 19 Update : 'बिग बॉस 19'च्या घरी नवीन वाद झालेले पाहायला मिळत आहे. घरात तान्या मित्तल ढसाढसा रडताना दिसत आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.
Bigg Boss 19 Update
Bigg Boss 19SAAM TV
Published On
Summary

'बिग बॉस 19'च्या घरात तान्या मित्तल आणि मालती चाहर यांच्यात भांडणे होतात.

मालती चाहर तान्या मित्तलला स्विमिंग पूलमध्ये ढकलते.

'बिग बॉस 19'च्या घरात मालती चाहरमुळे तान्या मित्तल ढसाढसा रडते.

'बिग बॉस 19'च्या (Bigg Boss 19 ) घरात रोज एक नवीन ड्रामा पाहायला मिळत आहे. घरातील सदस्य प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या आठवड्यात मालती चाहरची घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. घरात आल्यापासून मालतीने तान्या मित्तलला टार्गेट केले आहे. अशात आता बिग बॉसने नवीन प्रोमो शेअर केला आहे. ज्यात तान्या मित्तल ढसाढसा रडताना दिसत आहे. नेमकं झालं काय, जाणून घेऊयात.

'बिग बॉस 19'च्या घरात नॉमिनेश टास्क सुरू असतो. ज्यात मालती चहर आणि फरहाना या डायन बनलेल्या असतात. टास्कसाठी घरात दोन गट देखील पडतात. तेव्हा डायन बनलेली मालती चहर तान्या मित्तलला स्विमिंग पूलमध्ये जोरात धक्का देते. तिला स्विमिंग पूलमध्ये ढकलते. जे पाहून घरातील काही सदस्यांना मोठा धक्का बसतो. तर दुसरीकडे तान्या मित्तल ढसाढसा रडायला लागते.

मालती तान्या मित्तलला (Tanya Mittal ) विचारते की, "तू रडत का आहेस?" त्यावर तान्या म्हणते, "मी तुझ्यावर रागावले नाही..." त्यावर पुन्हा मालती (Malti Chahar ) म्हणते की, "तुला जेवढे रडायचे आहे तेवढे रड, पण मी तुला पुन्हा ढकलेन..." त्यानंतर मालती गौरव खन्ना, अशनूर , मृदुलला म्हणते की, "तान्या फक्त साड्याच नेसते असं नाही. तिला माहिती होते की टास्कमध्ये पाण्यात जावे लागेल. ती अटेन्शन मिळवण्यासाठी ओव्हर करतेय. "

नॉमिनेट सदस्यांची नावे

बिग बॉसच्या घरातून या आठवड्यात सहा सदस्य नॉमिनेट झाल आहेत.

  • जीशान कादरी

  • नीलम गिरी

  • मृदुल तिवारी

  • बसीर अली

  • अशनूर कौर

  • प्रणित मोरे

Bigg Boss 19 Update
Bigg Boss अचानक बंद करण्याचे आदेश, स्पर्धकांचे काय होणार? वाचा नेमकं काय घडलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com