Abhijeet Sawant Success Story : इंडियन आयडल जिंकून रात्रीत स्टार, बिग बॉस मराठी गाजवलं, कोट्यवधींच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिजीतचा संघर्षमय प्रवास, वाचा

Abhijeet Sawant : सध्या 'बिग बॉस मराठी 5'ची चर्चा सर्वत्र होत आहे. अशात यंदाचं सीझन गाजवणाऱ्या अभिजीत सावंतच्या यशाची कहाणी जाणून घेऊयात.
Abhijeet Sawant Story
Abhijeet SawantSAAM TV
Published On

सुप्रसिद्ध मराठमोळा गायक अभिजीत सावंत त्याच्या अनेक सुपरहिट गाण्यांमुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. अभिजीत नेहमी त्याच्या गाण्यांमुळे चर्चेत राहिलेला आहे. अभिजीतच्या गाण्याचे अनेकांना वेड आहे. सध्या अभिजीत (Abhijeet Sawant ) प्रेक्षकांचे मराठी बिग बॉसमधून मनोरंजन करताना पाहायला मिळत आहे.

'बिग बॉस मराठी 5' (Bigg Boss Marathi) आता अंतिम टप्प्यात पोहचला आहे. यात अभिजीत सावंतही टॉप 6 मध्ये पाहायला मिळत आहे. चाहत्यांनी तर त्याला कधीच विजेता घोषित केले आहे. त्याचा बिग बॉसच्या घरातील प्रवास प्रेक्षकांना खूप आवडला. तो वेळ प्रसंगी कठोर तर काही ठिकाणी त्याची विनोदी वृत्ती पाहायला मिळाली. तो आपला गेम कमाल खेळत आहे. जास्त काळ घरात तो शांत पाहायला मिळाला. 'बिग बॉस मराठी 5' च्या घरात अभिजीत सावंत आणि अभिजीत बिचुकले यांची गाण्याची जुगलबंदी पाहायला मिळाली.

बिग बॉसच्या घरात अंकिता आणि अभिजीतची चांगली घट्ट मैत्री झालेली पाहायला मिळाली. मात्र घरातील कामावरून नुकतेच त्यांच्यात भांडण झाले होते. तसेच बिग बॉसच्या घरात सुरुवातीपासून निक्की आणि अभिजीतची मैत्री देखील पाहायला मिळाली आहे. तर अभिजीत आणि निक्कीमध्ये देखील अरबाज गेल्यावर भांडण झालेले पाहायला मिळाले.

अभिजीत वैयक्तिक आयुष्य

अभिजीत लहानाचा मोठा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला. अभिजीतने मुंबईतील राजा शिवाजी विद्यालयातून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले तर चेतना कॉलेजमधून पुढील शिक्षण केले. पत्र्यांच्या घरात राहणारा अभिजीत आज एक सुखी आणि लग्झरी आयुष्य जगत आहे. अभिजीतने 2017 मध्ये शिल्पाशी लग्नगाठ बांधली. या दोघांनी 'नच बलिए' या डान्स रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला. अभिजीतला समीरा व आहाना अशा दोन मुली आहेत. अभिजीतची बायको शिल्पा केकचा व्यवसाय करते.

नुकतेच बिग बॉसने अभिजीतला एक खास सरप्राइज दिलं आहे. ज्यात त्याचा आतापर्यंतचा बिग बॉसच्या घरातील प्रवास दाखवला आहे. हे पाहताच अभिजीतला अश्रू अनावर झाले. बिग बॉसमध्ये अभिजीत सर्वांशी मिळून मिसळून वागताना दिसला. तसेच बिग बॉसच्या घरात अभिजीतला भेटायला पत्नी शिल्पा आणि त्याची दोन्ही मुलं आली होती. त्यांना पाहून अभिजीतला खूप आनंद झाला. त्यांच्यात खूप गोड संवाद होताना पाहायला मिळाला.

इंडियन आयडल शो

अभिजीत इंडियन आयडल (Indian Idol) शोमुळे प्रसिद्धीच्या झोकात आला. त्यांनी आपल्या गाण्याने अनेकांची मने जिंकली. तो 'इंडियन आयडल 1' विजेता ठरला. या विजयानंतर अभिजीतने कधी मागे वळून पाहिले नाही. तो यश संपादन करत गेला. त्यांच्या लोकप्रियतेमुळे तो कोट्यवधींचा मालक आहे. त्यांनी अनेक सुपरहिट गाणी देऊन सर्वाधिक कमाई केली आहे. त्यांनी अनेक स्टेज शो आणि लाइव्ह शो केले आहेत.

अभिजीत मालमत्ता

अभिजीत एका स्टेज शोमधून 7 ते 8 लाख रुपये कमवतो. अभिजीत अनेक अल्बमध्ये ही गायला आहे. अभिजीतचा 2005 साली 'आप का अभिजीत' नावाचा अल्बम लाँच झाला. यामुळे त्याला खूप लोकप्रियता मिळाली. लॉटरी या चित्रपटातून अभिजीतने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. मीडिया रिपोर्टनुसार, अभिजितची एकूण संपत्ती 8.3 कोटींची आहे.

Abhijeet Sawant Story
Bigg Boss Marathi : निक्कीच्या प्रेमात अरबाजची तहान भूक हरपली, मनधरणी करत म्हणाला…

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com