Bigg Boss Marathi: 'बिग बॉस'ने घेतली अभिजीत अन् निक्कीची फिरकी

Bigg Boss Marathi Day 62 : बिग बॉसच्या घरामध्ये सर्व सदस्यांच्या कुटुंबातील लोक त्यांना भेटायला येत आहेत. प्रदर्शित झालेल्या नव्या प्रोमोमध्ये बिग बॉस अभिजीत आणि निक्कीची फिरकी घेताना दिसत आहेत.
Bigg Boss Marathi Day 62
Bigg Boss Marathicanva
Published On

'बिग बॉस मराठी'च्या घरात टास्क, राडे, धमाका होतच असतो. पण त्यासह कधीकधी बिग बॉसदेखील सदस्यांची मजा आणि फिरकी घेताना दिसून येतात. आजच्या भागातही 'बिग बॉस' अभिजीत आणि निक्कीची फिरकी घेताना दिसणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात 'बिग बॉस' अभिजीतला फ्रीज करताना दिसणार आहेत. त्यामुळे निक्की त्याची मजा घेताना दिसत आहे. त्यानंतर पुढे 'बिग बॉस'देखील निक्कीची फिरकी घेताना दिसत आहेत.

Bigg Boss Marathi Day 62
Bigg Boss Marathi Nikki Tamboli: 'अरबाजचा साखरपुडा झालाय...' निक्कीच्या आईचा मोठा खुलासा, काय घडलं नेमकं Video पाहा

अभिजीतला 'बिग बॉस'ने फ्रिज केल्याने तो काहीही खाऊ शकत नाही. त्यामुळे 'बिग बॉस' निक्कीला म्हणत आहेत,"तू भरवू शकतेस". त्यावर निक्की नकार देते. निक्की म्हणते,"अख्खा सीझनभर सर्वांनी त्याला भरवलंच आहे". निक्की भरवत नसल्याने बिग बॉसने अभिजीतला रिलीज केलं. दुसरीकडे 'बिग बॉस' धनंजयला म्हणत आहेत,"धनंजय काय बनवताय?". त्यावर धनंजय डाळ बनवत असल्याचं बिग बॉसला सांगतो.

बिग बॉस पुढे म्हणतात,"आपली डाळ या घरात शिजते का?". वर्षा ताईंना बिग बॉस विचारतात,"धनंजयने जेवण बनवलं आहे.. काय विचार आहे".त्यावर उत्तर देत वर्षा ताई म्हणतात,"त्याचं सर्व तडकावालं असतं. त्यामुळे सगळ्याबाबतीत त्याला तडका लागतो". त्यावर 'बिग बॉस'विचारतात,"या तडक्यामुळे भडका उडेल का?". पुढे वर्षा ताई डीपी दादांचं कौतुक करताना दिसून येतात.

Bigg Boss Marathi Day 62
Bigg Boss Marathi: "बाबा थांब ना तू..." वडिलांसाठी अंकिताने मानले बिग बॉसचे आभार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com